Chhatrapati Shivaji Maharaj Dainik Gomantak
गोवा

Old Goa : छत्रपती शिवरायांच्या पुतळा नासधूस प्रकरणात 7 जणांना नोटीस; स्थानिकांचा संताप कायम

गुन्हेगारांना लवकरात लवकर अटक करा

दैनिक गोमंतक

खुरसावाडो-दिवाडी (Khursawado-Divar) येथे शुक्रवारी ( दि.16) रात्रीच्या सुमारास अज्ञाताने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची नासधूस करत पळ काढला होता. यावरुन खुरसावाडो-दिवाडी परीसरात वातावरण चांगलेच तापले असून या प्रकरणात पोलिसांनी आज 7 जणांना नोटीस पाठवल्या आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार काल शुक्रवारी (दि.16) खुरसावाडो-दिवाडी येथे अज्ञात व्यक्तीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची जाणीवपुर्वक नासधूस केली असल्याचा प्रकार रात्री पुतळ्याची पुजा करण्याच्या वेळी उघड झाला होता.

यावरुन स्थानिकांनी ओल्ड गोवा पोलिसात तक्रार दाखल करत गुन्हेगारांना लवकरात लवकर अटक करा अशी मागणी केली होती. यापार्श्वभूमीवर आज पोलिसांनी आज 7 जणांना नोटीस बजावली आहे. तसेच पोलिसांनी लवकरात लवकर गुन्हेगारांना अटक करण्यात यश मिळेल असे ही म्हटले आहे.

स्थानिकांचा संताप कायम

या घटनेवरुन स्थानिकांनी आक्रमक भुमिका घेतली आहे. पोलिसांनी लवकरात लवकर अटक करावी. तसेच या प्रकरणात सामिल असलेल्या सर्वांवर कारवाई करावी अशी मागणी केली आहे. रात्री पुतळ्याची पुजा करत असताना स्थानिकांच्या हा प्रकार समोर आला होता. यानंतर पोलिसात धाव घेत स्थानिकांनी कारवाईची मागणी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Dovorlim: सरपंच निवडले, 4 तासांत अविश्वास ठराव; दवर्ली पंचायतीत सत्तानाट्य; विरोधकांचा भाजपला दणका

Goa News: विजय राणे सरदेसाई यांची पुन्हा डिचोली ठाण्यात नेमणूक, कथित आरोप खोटा असल्याचे स्पष्ट

Mulgao: 'गावचे प्रमुख प्रश्न सोडवा, अन्यथा आम्हाला खाण व्यवसाय नकोच'! मुळगाववासीय ठाम; रात्रपाळीला विरोध

Goa Crime: 'तुला काम देतो', सांगून व्हिडीओ केला रेकॉर्ड; लैंगिक अत्‍याचारप्रकरणी पुण्यातून एकाला अटक

Goa Politics: खरी कुजबुज; राजकारण्‍यांना अचानक गोमातेचा कळवळा

SCROLL FOR NEXT