Old Goa Police Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: ..अखेर अट्टल गुन्हेगार गजाआड! 100 घरफोड्यांमध्ये सहभाग; जुने गोवे पोलिसांची यशस्वी कामगिरी

Goa Theft Case: जुने गोवे येथे झालेल्या घरफोडीच्या तक्रारीवरून सराईत गुन्हेगार लोकेश सुथार (३०, सांगली-महाराष्ट्र) याला महाराष्ट्रातील कवठे महाकाळ येथे ताब्यात घेण्‍यात आले. त्‍यानंतर जुने गोवे पोलिसांनी त्याला आपल्‍या पोलिस ठाण्यात आणून अटक केली.

गोमन्तक डिजिटल टीम

Old Goa Police Arrested Theft At Kavathe Mahankal Sangli

तिसवाडी: जुने गोवे येथे झालेल्या घरफोडीच्या तक्रारीवरून सराईत गुन्हेगार लोकेश सुथार (३०, सांगली-महाराष्ट्र) याला महाराष्ट्रातील कवठे महाकाळ येथे ताब्यात घेण्‍यात आले. त्‍यानंतर जुने गोवे पोलिसांनी त्याला आपल्‍या पोलिस ठाण्यात आणून अटक केली. गोवा आणि महाराष्ट्रात सुमारे १०० घरफोड्यांमध्ये त्याचा सहभाग आहे.

२८ सप्टेंबर रोजी सीमा सिंग (५०, जुने गोवे) यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी तपास सुरू केला होता. एसएफएक्स कॉलनी येथे मित्राच्या फ्लॅटमधून चोरट्यांनी तीन हजार रोख रक्कम आणि इतर मौल्यवान वस्तू चोरल्याचा उल्लेख तक्रारीत करण्यात आला होता. जुने गोवे पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०५ नुसार तक्रार नोंद केली होती.

तपासादरम्यान, धागेदोरे जुळवून आणि गुप्तचर स्रोतांद्वारे संशयितांची ओळख लोकेश रावसाहेब सुथार अशी झाल. जुने गोवे पोलिसांच्या पथकाने मिरज, सांगली आणि महाराष्ट्राच्या इतर भागांना थोड्या अंतराने तीन वेळा भेट दिली. कवठे महाकाल पोलिस आणि सांगली ग्रामीण पोलिसांच्या

मदतीने लोकेशचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान लोकेशने घरफोडी केल्याची कबुली दिली.

रत्‍नागिरी, पुण्‍यात केल्‍या बहुतांश घरफोड्या

संशयित लोकेश हा महाराष्ट्रातील रत्नागिरी, पुणे इत्यादी येथील विविध घरफोड्यांच्या गुन्ह्यांमध्ये आरोपी आहे. महाराष्ट्रात सुमारे १०० गुन्ह्यांमध्ये त्याचा शोध सुरू होता. जुने गोवे पोलिस निरीक्षक सतीश पडवळकर यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT