Sand Mining | Goa News
Sand Mining | Goa News Dainik Gomantak
गोवा

Goa Sand Mining: चोडण येथे अवैध वाळू उपसा करणाऱ्यांवर जुने गोवे पोलिसांची कारवाई

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Sand Mining: बेकायदेशीर वाळू उपसा करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई जुने गोवे पोलिसांनी चोडण माडेल येथे केली. या कारवाईत 6 जणांना ताब्यात घेतले आहे. तसेच त्यांच्याकडून 3 होड्यांसह सुमारे 45 हजारांची वाळू जप्त करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, चोडण माडेल येथे बेकायदेशीर वाळू उपसा होत असल्याची माहिती जुने गोवे पोलिसांना मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी छापा टाकला. या छाप्यात 6 जणांना ताब्यात घेतले आहे.

त्यांना ताब्यात घेऊन पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. तसेच वाळू काढण्यासाठी त्यांनी वापरलेल्या 3 होड्या आणि रेती मिळून 45 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. अनेक वर्षांपासून मांडवी नदीतून बेकायदेशीररित्या काढण्यात येणाऱ्या रेतीमुळे सरकारला कोणताही महसूल मिळत नव्हता. त्यामुळे ही कारवाई केली असल्याचे पोलिसांनी सांगितले.

राज्य सरकारने वाळू उपसा कायदेशीररित्या सुरू करण्यासाठी नवी अधिसूचना जारी केली होती. प्रशासनाकडून वाळू उत्खननासाठी परवाना दिला जाणार आहे. मात्र सुधारित गौण खनिज अधिसूचनेनुसार वाळू उपसा करताना प्रति परवानाधारक वार्षिक 1000 घनमीटर वाळू उपसा करण्याची मर्यादा असेल.

नव्या नियमानुसार सकाळी 6 ते संध्याकाळी 6 या वेळेतच वाळू उपसा करता येणार आहे. याबरोबर वारे माप उपसा होऊ नये याची काळजी घेत प्रशासनाने यांत्रिक पद्धतीने वाळू उपसा करता निर्बंध घालण्यात आले आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Final Vote Turnout: गोव्यात 75.20 टक्के मतदान

Goa Today's Top News: लोकसभा मतदानाला उत्सफूर्त प्रतिसाद, आता नजर निकालाकडे; गोव्यातील ठळक बातम्या

Panaji: भूक लागलीय, भजी कोठे मिळतील? केस काळे केले म्हणून कोणी 'भाऊ' होत नाही; पणजीतील मतदाराचा नाईकांवर रोष

Goa Loksabha Voting: उरले दोन तास! गोव्यात दुपारी तीनपर्यंत 61.39 टक्के मतदान

Goa Eco-Friendly Booth Video: गोव्यातील इको-फ्रेन्डली मतदान केंद्राची चर्चा; व्हिडिओ, फोटो व्हायरल

SCROLL FOR NEXT