Low Utilization of Old Goa Helipad Raises Questions About Helicopter Service
पणजी: ‘स्वदेश दर्शन’ योजनेअंतर्गत जुने गोवे येथे बांधलेल्या हेलिपॅडवर आतापर्यंत ३.२९ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत, परंतु पाच वर्षांत केवळ ५५ यशस्वी उड्डाणे आणि लँडिंग झाले.
राज्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी सुरू केलेली ही सेवेला कुठेतरी ‘ब्रेक’ मिळाला असला तरी भविष्यात हेलिकॉप्टर सेवा सुरू करण्याचा विचार असल्याचे पर्यटन विभागाने स्पष्ट केले आहे.
हेलिकॉप्टर सेवा सुरू करण्याबाबत सरकारचा सध्या कोणता प्रस्ताव नाही. तथापि, भविष्यात याबाबत विचार होऊ शकतो असे स्पष्ट केले आहे. यापूर्वी उत्तर गोव्यात सिकेरी येथे खासगी हेलिपॅड सेवा सुरू करण्यात आली होती, तीही यशस्वी झाली नाही.
गेल्या पाच वर्षांत राज्यात दोन हेलिपॅड सेवा सुरू झाल्या, परंतु दोन्ही अपयशी झाल्याने सरकारने तूर्तास हा विचार बाजूला करून पर्यटनावर भर देणे आवश्यक असल्याचे मत काही पर्यटन भागीदारांनी व्यक्त केले आहे.
बॅट बेटावर हेलिकॉप्टर सेवा पर्यटनासाठी गेम-चेंजर ठरू शकते असा विश्वास देखील काहींनी व्यक्त केला आहे. बेटावरील निर्मळ समुद्रकिनारे आणि ऐतिहासिक महत्त्व पर्यटकांसाठी प्रचंड आकर्षित ठरू शकते. मात्र अशा प्रकारची सेवा लागू करण्यापूर्वी पायाभूत सुविधा उपलब्ध करणे महत्त्वाचे आहे.
जुने गोवे येथे एम/एस रोहित इक्विपमेंट्सने हेलिपॅडचे बांधकाम १६ मे, २०२० रोजी काम पूर्ण केले.
सध्या सोअरिंग एरोस्पेस प्रायव्हेट लिमिटेड, हरियाना ही संस्था या सुविधेचे संचालन करत आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.