Goa breaking traffic update Dainik Gomantak
गोवा

Goa Road Closure: धावजे रस्त्याबाबत मोठी अपडेट!! फक्त 'या' वेळेत वाहतूकीसाठी खुला ठेवणार; कुंभारजुव्याचे आमदार फळदेसाईंची माहिती

Dhavje Road Update: जुने गोवे- गवंडाळी रस्त्यावर रेल्वेमार्गावर उड्डाणपुलाचे बांधकाम सुरू करण्यात आले आहे

Akshata Chhatre

खांडोळा: जुने गोवे- गवंडाळी रस्त्यावर रेल्वेमार्गावर उड्डाणपुलाचे बांधकाम सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे सोमवार (दि.२३) पासून हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार आहे. रविवारी सुटीचा दिवस असल्यामुळे काही प्रमाणात वाहतूक कमी होती, त्यामुळे काम जोरात सुरू होते. गवंडाळीच्या बाजूला खांब उभारण्यासाठी खोदाई करण्यासाठी यंत्रणा सज्ज करण्यात  आली आहे. काही ठिकाणी पत्रे उभारून रस्ता अरुंद केला आहे.

'या' वेळेत रास्ता असेल मोकळा

माध्यमांना मिळालेल्या माहितीनुसार, गवंडाळी धावजेचा रस्ता सकाळी दहा वाजेपर्यंत आणि संध्याकाळी पाचनंतर वाहतुकीसाठी खुला ठेवला जाईल. सकाळी १० ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत रस्ता बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती कुंभारजुव्याचे आमदार राजेश फळदेसाई यांनी दिली.

मोठ्या प्रमाणात लोकं कामा धंद्यानिमीत्त ह्या रस्त्याने पणजीत येत असल्याने सकाळी आणि संध्याकाळी त्याची गैरसोय टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

रस्ता अरुंद झाल्यामुळे चारचाकी वाहन चालविणे अडचणीचे होते आहे, शिवाय रेल्व फाटकाच्या पुढे जुने गोवेच्या बाजूनेही खांब उभे करण्याचे काम सुरू आहे. तेथेही अर्धा रस्ता अडविण्यात आहे. त्यामुळे तेथेही एकेरी वाहतूक सुरू आहे.

त्यामुळे दोन्ही बाजूला वाहने हाकताना अडचण होतेय. सोमवारपासून पूर्ण रस्ता बंद करण्यात येणार असल्याने वाहनचालकांना बाणास्तारी मार्गे पणजीला ये-जा करावी लागलं. माशेल, वाळपई, साखळीहून पणजी, वास्कोला जाणाऱ्यांना बाणास्तरीमार्गे थोड्या अधिक अंतराने प्रवास करावा लागणार आहे.

या पुलाच्या कामामुळे मच्छिमार प्रशिक्षण केंद्र, एला ओल्ड गोवा ते धेम्पो फुटबॉल ग्राउंड, गवंडाळी सोमवारपासून बंद ठेवण्यात येणार आहे. इतर रस्ता स्थानिकांसाठी खुला राहणार आहे. हा पूल कुंभारजुवा आणि माशेल येथे जाण्यासाठी तसेच वाळपई, साखळी, आमोणा, माशेल आणि बेळगाव येथून येणाऱ्या लोकांसाठी महत्त्वाचा आहे. पुलाचे काम पूर्ण झाल्यानंतर विनाअडथळा या मार्गावरून प्रवास करता येईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Weather Update: गोव्यात विजांच्या कडकडाटासह बरसणार मुसळधार सरी, आयएमडीने जारी केला 'नाऊकास्ट' इशारा; नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

PM मोदींच्या दौऱ्यासाठी काणकोणमध्ये 3 हेलिपॅड सज्ज! 77 फूट उंच श्रीरामांच्या मूर्तीचे करणार अनावरण

26 नोव्हेंबरला दुर्मिळ 'लक्ष्मी नारायण योग'! 'या' 4 राशींच्या लोकांवर होणार धन वर्षा, करिअरमध्ये मोठ्या प्रगतीचा योग; उत्पन्नाचे स्रोत वाढणार

विकेट पडताच टीव्ही बंद करायचे, 'या' महान भारतीय क्रिकेटपटूला मुलगा मानायचे, धर्मेंद्र यांच्या निधनानंतर 'ती' खास पोस्ट चर्चेत!

Goa Politics: ''भाजपने यादी जाहीर केल्यावरच आम्ही उमेदवार देऊ!'', ZP Electionसाठी पाटकरांचा 'वेट ॲण्ड वॉच'चा फॉर्म्युला

SCROLL FOR NEXT