Goa Road Closure: गोव्यातील 'हा' महत्वाचा रस्ता राहणार बंद! उड्डाणपुलाचे काम सुरु; पर्यायी मार्ग जाणून घ्या..

Old Goa Gavandali Road: बांधकामानिमित्त फिशरमन ट्रेनिंग सेंटर ते धेंपो फुटबॉल ग्राऊंडपर्यंतचा रस्ता बंद राहाणार आहे. त्यामुळे माशेल, वाळपई, बेळगावहून येणाऱ्यांना माशेल-बाणास्तरी या मार्गाने ये-जा करावी लागणार आहे.
Old Goa Gavandali Road Update, Goa Road Closure News
Old Goa Gavandali Road Update, Goa Road Closure NewsDainik Gomantak
Published on
Updated on

खांडोळा: जुने गोवे- गवंडाळी रस्त्यावर रेल्वेमार्गावर उड्डाणपुलाचे बांधकाम सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे सोमवार २३ पासून हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार आहे. त्यामुळे माशेल, वाळपई, साखळीहून पणजी, वास्कोला जाणाऱ्यांना बाणास्तरीमार्गे प्रवास करावा लागणार आहे.

या पुलांचे काम फेब्रुवारी महिन्यात सुरू करण्यात येणार होते, पण काही कारणाने काम सुरू होण्यास विलंब लागला. त्यामुळे वेळेत काम पूर्ण होण्याची शक्यता कमीच आहे. हा रस्ता २५ फेब्रुवारी २०२५ ते १९ जानेवारी २०२६ पर्यंत बंद ठेवण्यात येणार असल्याचे यापूर्वी जाहीर करण्यात आले होते. पण काम सुरू न केल्यामुळे रस्ता खुलाच होता.

या पुलाच्या कामामुळे मच्छिमार प्रशिक्षण केंद्र, एला ओल्ड गोवा ते धेम्पो फुटबॉल ग्राउंड, गवंडाळी सोमवारपासून बंद ठेवण्यात येणार आहे. इतर रस्ता स्थानिकांसाठी खुला राहणार आहे.

हा पूल कुंभारजुवा आणि माशेल येथे जाण्यासाठी तसेच वाळपई, साखळी, आमोणा, माशेल आणि बेळगाव येथून येणाऱ्या लोकांसाठी महत्त्वाचा आहे. पुलाचे काम पूर्ण झाल्यानंतर विनाअडथळा या मार्गावरून प्रवास करता येणार आहे. या पुलासाठी कोकण रेल्वे आणि गोवा सरकार प्रत्येकी ५०% खर्च करत आहेत

Old Goa Gavandali Road Update, Goa Road Closure News
Goa Belgaum Road: गोवेकरांच्या अडचणीत वाढ! जांबोटी-बेळगावमार्गे वाहनांना प्रवेश बंद, खानापूरमार्गे वळवली वाहतूक

बाणस्तारीमार्गे वाहतूक

पुलांच्या बांधकामानिमित्त फिशरमन ट्रेनिंग सेंटर ते धेंपो फुटबॉल ग्राऊंडपर्यंतचा रस्ता बंद राहाणार आहे. त्यामुळे माशेल, वाळपई, बेळगावहून येणाऱ्यांना माशेल-बाणास्तरी या मार्गाने ये-जा करावी लागणार आहे. कुंभारजुवे-गवंडाळी पुलानंतर डाव्याबाजूला वळून खोर्लीमार्गेही रस्ता आहे. पण हा रस्ता अरुंद असल्यामुळे वाहतूक कोंडीची शक्यता आहे. त्यामुळे बाणास्तारी रस्त्याने थेट पणजी, वास्कोकडे ये-जा करता येईल.

Old Goa Gavandali Road Update, Goa Road Closure News
Belagavi–Chorla Road Closed: बेळगाव-चोर्ला मार्ग ठप्प! माळप्रभा नदीवरील पूल गेला वाहून, गोव्याकडे जाणाऱ्या वाहतुकीचा मार्ग बदलला

महिनाभरात चार खांब!

जुने गोव्याच्या बाजूने गेला महिनाभर खांब उभारण्यासाठी खोदकाम सुरू होते. त्या ठिकाणी किमान चार खांबासाठी खोदाई पूर्ण झाली असून क्रॉंक्रिटीकरणही झाले आहे. इतर खाबांचे काम सुरू आहे. गेल्या दोन दिवसांपासून गवंडाळीच्या बाजूनेही खोदकाम सुरू आहे. रस्त्यांवर पत्रे उभे केल्यामुळे वाहतुकीसाठी जागा कमी आहे. त्यामुळे वाहनकोंडी सुरू झाली होती. पुलाच्या कामाला गती देण्यासाठी हा रस्ता पूर्ण बंद करण्यात येणार आहे, अशी माहिती बांधकाम विभागाच्या सूत्रांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com