Old Goa Gomantak Digital Team
गोवा

Old Goa Encroachment: जुने गोवेतील अतिक्रमणांवर कारवाई

‘G-20’ परिषद : जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशावरून पंचायतीची कारवाई

गोमन्तक डिजिटल टीम

Action Against Encroachment in Old Goa: राज्यात17 ते 19 एप्रिल दरम्यान ‘जी-20’ परिषदेच्या बैठका होणार आहे. याकरिता राज्यातील रस्ते आणि परिसराचे सौंदर्यीकरण सुरू आहे.

या पार्श्‍वभूमीवर रस्त्याच्या बाजूला बेकायदेशीरपणे उभे केलेले गाळे आणि अतिक्रमण हटवण्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी नगरपालिका आणि पंचायतीना दिला आहे. त्याअनुषंगाने जुने गोवे येथील अवैध गाळे काढण्यात आले आहेत.

मुख्यसचिव, जिल्हाधिकारी आणि संबंधित अधिकाऱ्यांनी गोमेकॉ येथे करण्यात आलेल्या अतिक्रमणाचे निरीक्षण केले होते. त्यानुसार जिल्हाधिकारी आणि गट विकास अधिकारी (बीडीओ) यांनी अतिक्रमण हटवण्याचे आदेश दिले आहे.

14 एप्रिलपर्यंत बेकायदेशीररीत्या अतिक्रमण केलेल्या गाळे आणि व्यवसायिकांना हटवण्याचे सक्त निर्देश पालिका आणि पंचायतींना दिले आहे.

वाहतुकीला समस्या

गोमेकॉच्या सुपर स्पेशलिटी विभागाच्या इमारतीच्या समोरील अतिक्रमण केलेले गाळे हटवण्यासाठी अधिकाऱ्यांनी निरीक्षण केले आहे. ‘जी-20’ परिषद होणार असून गाळे रस्त्याच्या बाजूला असल्याने वाहतुकीला समस्या निर्माण होत आहे.

अनेकांनी आपले गाळे हटवले आहे. काही जणांचे गेल्या 30 वर्षांपासून गाळे येथे आहे. परंतु जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिल्याने पंचायत त्यात काहीही करू शकत नाही.

सँड्रा गोन्साल्विस, सरपंच, जुने गोवे

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asia Cup Trophies: 'ट्रॉफी चोरा'कडून भारताच्या विजेतेपदाची ट्रॉफी कधी मिळणार? BCCI नं स्पष्टच सांगितलं; आंतरराष्ट्रीय स्तरावर मोहसिन नक्वीची पुन्ही नाचक्की

Viral Post: 1.5 कोटींची नोकरी सोडली; आता महिन्याला फक्त 500 रूपये कमाई; तरीही तरुणी म्हणते, 'हा निर्णय चुकीचा नाही' VIDEO

Lashkar e Taiba Commander Killing: पाकड्यांच्या 'टेरर फॅक्टरी'ला मोठा हादरा! हाफिज सईदचा जवळचा दहशतवादी कराचीत ठार; अज्ञात हल्लेखोरांचा थरारक गोळीबार

चार्जिंगचे टेन्शन कायमचे संपले! Redmi ने भारतात लॉन्च केले 10,000mAh बॅटरीचे 2 तगडे फोन; जाणून घ्या बजेटमधील किंमत आणि स्पेसिफिकेशन्स

Robotic Surgery: कमी वेदना, जलद रिकव्हरी! रोबोटिक सर्जरी म्हणजे काय? नॉर्मल ऑपरेशनपेक्षा किती वेगळी? जाणून घ्या वैद्यकीय तज्ज्ञांकडून

SCROLL FOR NEXT