Goa Court  Dainik Gomantak
गोवा

Old Goa Accident: 3 वर्षांपूर्वी झाला होता अपघात, पादचारी झाला ठार; सबळ पुराव्याअभावी बसचालकाची निर्दोष मुक्तता

Old Goa Bus Accident: जुने गोवे येथे २०२२ मध्ये झालेल्या प्राणघातक बसअपघातप्रकरणी चालक सदानंद रायकर याची मेरशी येथील प्रथम वर्ग न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली.

Sameer Panditrao

पणजी: जुने गोवे येथे २०२२ मध्ये झालेल्या प्राणघातक बसअपघातप्रकरणी चालक सदानंद रायकर याची मेरशी येथील प्रथम वर्ग न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. पोलिस तपासातील गंभीर त्रुटी आणि ठोस पुराव्यांचा अभाव यामुळे न्यायालयाने संशयितास संशयाचा लाभ दिला.

८ मे २०२२ रोजी धुळापी-खोर्ली येथे झालेल्या या अपघातात बिहारचा धर्मेंद्र माहतो (३२) हा पादचारी गंभीर जखमी होऊन उपचारादरम्यान मरण पावला होता. या घटनेनंतर रायकर (५३, रा. शिरोडा) यांच्यावर भारतीय दंड संहिता कलम २७९ व ३०४-अ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

२१ पानी निकालात न्यायाधीश अंकिता नागवेकर यांनी चौकशीत झालेल्या विसंगती व त्रुटींवर कठोर शब्दांत ताशेरे ओढले. मुख्य साक्षीदारांची साक्ष कुचकामी ठरली. पंच साक्षीदारांनीही कोऱ्या कागदावर सही केल्याची कबुली दिली किंवा पोलिसांचे ‘नेहमीचे साक्षीदार’ असल्याचे उघड झाले. त्यामुळे पुराव्यांचा विश्वासार्हपणा संशयास्पद ठरला.

दरम्‍यान, फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम २४८(१) अंतर्गत संशयिताची मुक्तता करण्यात आली असून जामीननामा रद्द करण्यात आला आहे. मात्र, सरकार उच्च न्यायालयात आव्‍हान देणार असल्यास हजर राहण्यासाठी त्‍याला १० हजार रुपयांचा बाँड सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. जवळपास तीन वर्षे या खटल्याची सुनावणी सुरू होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Narkasur in Goa: 20 फुट उंच, अक्राळ-विक्राळ डोळ्यांचा महाकाय! जगात सापडणार नाही असा अनुभव; कुठे बघाल 'नरकासुर दहनाचा' थरार?

Afghanistan Pakistan Clash: तालिबानच्या हल्ल्याने पाकिस्तानची नाचक्की! सैनिकांच्या पॅन्ट आणि शस्त्रे जप्त; 48 तासांची युद्धबंदी जाहीर Watch Video

Inspirational Story: पुत्र व्हावा ऐसा... मुलाने आई - बाबांसाठी अमेरिकेत खरेदी केले आलिशान घर, कार; US दर्शनही घडवले Watch Video

Diwali Muhurat: गोव्यात धाकटी दिवाळी कधी? प्रदोष काळ ठरू शकतो मोठा 'अडथळा' तारखांचा गोंधळ संपवा; अचूक मुहूर्त वाचा

Goa Live Updates: चंद्रेश्‍वर-भूतनाथ संस्‍थानात सोमवारी पालखी उत्‍सव

SCROLL FOR NEXT