Strong winds blow in Panaji, leaves fly on building(Edited)Restore original
Strong winds blow in Panaji, leaves fly on building(Edited)Restore original Dainik Gomantak
गोवा

पणजीत वादळी वाऱ्याचा फटका, इमारतीवरील पत्रे उडाले

दैनिक गोमन्तक

वादळी वारा आणि मुसळधार पावसाने राजधानी पणजी शहरासह अनेक ठिकाणी पुन्‍हा तडाखा दिला. गुरुवारी रात्री साडेआठच्‍या सुमारास वादळी वाऱ्यास मुसळधार पावसाने हजेरी लावली. यामुळे शहरातील सखल भागात पाणी साचले. तर घरी परतणाऱ्या चाकरमान्‍यांचे हाल झाले. विशेषतः दुचाकीचालक अडकून पडले. (Goa Rain Update)

आज दुपारपासूनच उष्म्याचे प्रमाण वाढले होते. दोन दिवसांपूर्वीही रात्रीच्‍यावेळी मुसळधार पाऊस पडला होता. एक दिवसाची विश्रांती घेऊन आज गुरुवारी पुन्‍हा पाऊस दाखल झाला. हवामान खात्‍याने यापूर्वीच अवकाळी पावसाची सूचना दिली होती. पणजी बसस्‍थानक परिसर सखल भाग असल्‍याने क्रांती सर्कल आणि स्‍थानकाच्‍या आतील बाजूस पाणी साठले होते. जोरदार वाऱ्यामुळे काही दुकानांबाहेर उभारलेले तात्‍पुरते शेड मोडून पडल्‍याचे दिसून आले. तसेच झाडांच्‍या फांद्याही तुटून पडल्‍याचे प्रकार घडले.

माशेल येथे भाविक अडकले

माशेल येथे वीज पुरवठा खंडित झाला. वादळामुळे बाजारातील दुकानांचे पत्रे उडून गेले. तसेच बाजारहाट करण्यासाठी आलेले लोक अडकून पडले. येथील विठ्ठल मंदिरात पालखी उत्‍सव होता. या सोहळ्यासाठी लोकांनी मोठी गर्दी केली होती. अचानक आलेल्‍या पावसामुळे तसेच वीज खंडित झाल्‍याने भाविकांची तारांबळ उडाली. रात्री उशिरापर्यंत पावसाची रिपरिप सुरू होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Illegal Constructions: किनारपट्टी लगतची बेकायदा बांधकामे तातडीने पाडा; दक्षिण गोव्याच्या जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

Goa Crime News: नेरुळ येथे बनावट कॉल सेंटर चालवणाऱ्यांचा पर्दाफाश; पोलिसांकडून तिघांना अटक

Goa: राज्यात दोन ठिकाणी आगीच्या घटनेत मोठे नुकसान हानी; जीवितहानी टळली

Loksabha Election 2024: काँग्रेस उमेदवार विरियातो यांच्या समर्थक महिलेने पैसे वाटल्याची तक्रार

Goa River: राज्यातील सहा नदीपट्टे प्रदूषित; केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून जलस्रोतांची पाहणी

SCROLL FOR NEXT