pension fraud Goa Dainik Gomantak
गोवा

Old Age Pension: वृद्धांच्या योजनेत 'मृत' लाभार्थी! 6000 खाती बंद; फळदेसाईंची कठोर कारवाई

Goa pension Scheme: अधिकाधिक गरजू लोकांना मदत मिळावी म्हणून सरकारकडून हे पाऊल उचललं गेल्याची माहिती मंत्री फळदेसाई यांनी दिली

Akshata Chhatre

पणजी: गोवा राज्य सरकारकडून वृद्धांना आधार देण्यासाठी आर्थिक मदतीची योजना राबवली जाते. मात्र या योजनेचा गैरवापर झाल्याचे निदर्शनास आले असल्याने राज्याचे समाजकल्याण मंत्री सुभाष फळदेसाई यांनी काही लाभार्थ्यांची नावं वगळली आहेत. अधिकाधिक गरजू लोकांना मदत मिळावी म्हणून सरकारकडून हे पाऊल उचललं गेल्याची माहिती मंत्री फळदेसाई यांनी दिली.

खरंतर सरकारकडून राज्यातील वृद्धांना मिळणाऱ्या आर्थिक मदतीत दोन महिन्यांपेक्षा जास्ती कालावधी जाणार नाही याची खात्री बाळगली जाते, मात्र काही कारणांमुळे यामध्ये काहीसा उशीर होतोय. अनेकवेळा मृत व्यक्तींच्या नावे सुद्धा ही आर्थिक मदत मिळवली जात असल्याची माहिती त्यांनी दिली.

हे प्रकरण आटोक्यात यावं म्हणून सरकार प्रयत्न करत आहे. आत्तापर्यंत ६००० बोगस खातेधारकांना सरकारने शोधून काढत अशी खाती बंद करण्यात आलीये. अशा मृत्य व्यक्तींच्या खात्याचा शोध लावण्यात आणि ती खाती कायमची बंद करण्यात काहीसा वेळ जात असल्याने इतरांना पैसे मिळण्यात विलंब होतो.

एक लाख तीस हजार लाभार्थ्यांपैकी ६००० बोगस खातेधारक सरकारच्या हाती लागलेत. तसेच काहीवेळा पासबुकच्या तांत्रिक अडचणींमुळे पैसे खात्यात जाण्यास काहीसा उशीर होतो, मात्र यावर सरकारकडून प्रयत्न सुरु आहेत. खरोखर गरजू माणसांना मदत मिळावी आणि बोगस खात्यांमुळे या तंत्रात अडचणी येऊ नयेत म्हणून प्रयत्न सुरु असल्याची माहिती सुभाष फळदेसाई यांनी माध्यमांना दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT