Altone D'Costa Dainik Gomantak
गोवा

Ration Card: शिधापत्रिकासंबंधित ऑफलाइन अर्ज स्वीकारण्यासाठी सूचना जारी; उशिराने सरकारला जाग - डिकॉस्ता

Ration Card: भाजप सरकार हे नेटवर्कची देखभाल करण्यास अपयशी ठरले असून त्यामुळे लोकांची गैरसोय होत आहे, असा दावा डिकॉस्ता यांनी केला.

सुशांत कुंकळयेकर

Ration Card

सरकारी अधिकाऱ्यांकडे सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर, भाजप सरकारने अखेर शिधापत्रिकांशी संबंधित ऑफलाइन अर्ज स्वीकारण्यासाठी सूचना जारी केल्या. नागरी पुरवठा विभागाचे ऑनलाइन पोर्टल कोलमडल्यामुळे अडचणींचा सामना करणाऱ्या सामान्य लोकांना मोठा दिलासा मिळाला आहे असे केपेचे आमदार एल्टन डिकॉस्ता यांनी म्हटले आहे.

लोकांना शिधापत्रिका लाभार्थ्यांचे हस्तांतरण, तसेच निलंबित शिधापत्रिका संबंधी अर्ज सादर करताना सरकारच्या कोलमडलेल्या इंटरनेट नेटवर्क व नागरी पुरवठा खात्याची बंद असलेली पोर्टल यामुळे प्रचंड अडचणी आल्या, असे डिकॉस्ता म्हणाले.

तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सरकारने गोव्याला इंट्रानेट ब्रॉडबँड ऑप्टिक फायबर नेटवर्क भेट दिले होते. हे इंटरनेट सेवेचे जाळे गोव्यातील प्रत्येक पंचायतीपर्यंत पोहोचले होते. दुर्दैवाने, भाजप सरकार हे नेटवर्कची देखभाल करण्यास अपयशी ठरले असून त्यामुळे लोकांची गैरसोय होत आहे, असा दावा त्‍यांनी केला.

मला आशा आहे की नागरी पुरवठा निरीक्षक नागरी पुरवठा संचालक जयंत तारी यांच्या मेमोरेंडमची दखल घेवून जाईल ताबडतोब लोकांकडून थेट अर्ज स्वीकारण्यास सुरुवात करतील आणि लोकांना सेवा देतील, असे ते म्हणाले.

सरकारने लोकांप्रती संवेदनशील राहून जनतेला भेडसावणाऱ्या समस्यांवर तत्परतेने काम केले पाहिजे. माझ्या वैयक्तिक पाठपुराव्यानंतरही बऱ्याच दिवसांनी सरकारला जाग आली हे खरोखरच खेदजनक आहे. मेमोरँडम जारी केल्याबद्दल मी नागरी पुरवठा संचालकांचे आभार मानतो, असे डिकॉस्‍ता यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Governor: सबरीमाला मंदिरात महिलांच्या प्रवेशावरुन वक्तव्य; गोव्याचे राज्यपाल पिल्लई यांच्या विरोधातील FIR रद्द

Goa Exposition: सामाजिक सलोखा बिघडवण्याचा कट? PFI च्या चार सदस्यांची कसून चौकशी

Goa Crime: नोएडाच्या महिलेला मारहाण करुन विनयभंग; तामिळनाडूच्या आरोपीला दोन वर्षे कारावासाची शिक्षा

Saint Francis Xavier Exposition: "सेंट फ्रान्सिस झेवियर यांचे पवित्र शव म्हणजे दैवी चमत्कार": फादर हेन्री फाल्काओ

Saint Francis Xavier Exposition In Pictures: ओल्ड गोव्यात एक्सपोझिशनला सुरुवात; पाहा पहिल्याच सोहळ्याचे खास फोटो

SCROLL FOR NEXT