OSD inspected Karmlaghat in Canacona Dainik Gomantak
गोवा

तवडकरांच्या भेटीनंतर केंद्रीय मंत्री गडकरींनी करमलघाट रस्त्याच्या पहाणीसाठी धाडले OSD

करमलघाटात धोकादायक वळणावर रस्ता रूंदीकरणासाठी केंद्रीय वाहतूक व राष्ट्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी अतिरिक्त पाच कोटी रूपये देण्याचे मान्य केले आहेत.

गोमंतक ऑनलाईन टीम

OSD inspected Karmlaghat In Canacona: करमलघाटातील धोकादायक वळणावर रस्ता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी त्यांचे ओएसडीना (officer on special duty) पाठवून करमलघाट रस्त्याची पहाणी केली.

यावेळी ओएसडी अमोल बिरासदार पाटील, सभापती रमेश तवडकर यांच्यासह नगराध्यक्ष रमाकांत नाईक गावकर, महामार्ग विभागाचे सहाय्यक अभियंता सागर शेट, निवृत्त सहाय्यक अभियंता सुभाष पागी, सभापतीचे निजी सचिव राजेंद्र बोरकर, श्रीस्थळ पंचायतीचे माजी सरपंच गणेश वेळीप, पंच अक्षदा वेळीप, निलेश गावकर, शंभा नाईक देसाई, सम्राट भगत उपस्थित होते.

'मडगाव- कारवार हमरस्त्याचा करमलघाट ते गुळे हा टापू दिवसेंदिवस धोकादायक बनत चालला आहे ही बाब केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या निदर्शनास आणून दिली होती. करमलघाटात धोकादायक वळणावर रस्ता रूंदीकरणासाठी केंद्रीय वाहतूक व राष्ट्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी अतिरिक्त पाच कोटी रूपये देण्याचे मान्य केले आहेत.' असे सभापती रमेश तवडकर यांनी माहिती देताना सांगितले.

'चारपदरी रस्त्यासाठी लागणाऱ्या जमिनीसाठी भूसंपादन प्रक्रिया ही लांबणारी प्रक्रिया आहे हे वास्तव लक्षात घेऊन तातडीने धोकादायक वळणे कापून त्याजागी रस्ता रुंदीकरण करण्यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी दिल्लीत जाऊन केंद्रीय मंत्र्याची भेट घेतली.

त्यांना वस्तू स्थिती समजावून सांगितली आहे या ठिकाणी आठवड्यातून किमान तीन अपघात घडत असतात हे निदर्शनास आणून दिल्यानंतर गडकरी यांनी त्वरीत रस्ता रुंदीकरण करण्यासाठी तातडीने पाच कोटी रूपये मंजूर केले आहेत.' असे तवडकर म्हणाले.

यापूर्वी हमरस्त्यावरील अर्धफोंड येथील तळपण नदीवरील पूलाची दुरूस्ती व बाबरे पूल उभारणी करून राहिलेल्या अतिरिक्त निधीतून रस्ता रुंदीकरण करण्याचा प्रस्ताव होता मात्र हा निधी तुटपुंजा असल्याने नव्याने प्रस्ताव तयार करून रस्ता वाहतूक व राष्ट्रीय महामार्ग मंत्रालयाला सादर करण्यात आला आहे.

त्या प्रस्तावाचा पाठपुरावा करण्यात येत त्याचाच भाग म्हणून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आपले ओएसडी यांना काणकोणात पाठवून परिस्थिती समजून घेतली आहे. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी रस्ता रुंदीकरण कामाला प्रारंभ होईल अशी अपेक्षा सभापती तवडकर यांनी व्यक्त केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT