Crime News  Dainik Gomantak
गोवा

Anjuna Police: गांजा बाळगल्याप्रकरणी ओडिसातील तरूणाला अटक, 3.10 लाखांचा गांजा जप्त

अंजुना पोलिसांची कारवाई

गोमन्तक डिजिटल टीम

गांजा बाळगल्याप्रकरणी ओडिसातील तरूणाला अटक करण्यात आली आहे. सायमन माळी (वय 23, रा. ओडिसा) असे या अटक तरूणाचे नाव आहे. सायमनजवळ तीन लाख 10 हजार रूपये किंमतीचा 3.10 किलो गांजा आढळून आला आहे. अंजुना अर्पोरा येथे आज (दि.12) ही कारवाई केली. पोलिसांनी मुद्देमालासह आरोपीला ताब्यात घेतले असून, पुढील तपास सुरू आहे.

डिचोलीतील सातेरी मंदीर चोरट्यांनी फोडले

सर्वण-डिचोली येथील श्री सातेरी देवीचे मंदिर फोडून सुवर्णालंकारासह दोन लाखांहून अधिक रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. गुरूवारी (दि.11) रात्री ही घटना घडली आहे. चोरट्यांनी देवीच्या अंगावरील मंगळसूत्र, नथ अशा सुवर्णालंकारासह समया आदी वस्तू लंपास केल्या आहेत.

तूरडाळ व साखर प्रकरणात नागरी पुरवठा संचालक निलंबित

गोव्यात 241 टन तूरडाळ सडल्याच्या घटनेनंतर राज्यात 10.3 मेट्रिक टन साखरही खराब झाल्याची घटना समोर आली होती. याप्रकरणी एका नागरी पुरवठाचे संचालकावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणात तत्कालीन संचालक सिद्धीविनायक नाईक यांच्यावर ही निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT