NCB arrested a drug smuggler in goa Dainik Gomantak
गोवा

वेर्णा पोलिसांनी तरुणाला ढोकल्या बेड्या, अंमली पदार्थ जप्त

1.10 लाख रुपयांचा गांजा जप्त; तरुणाला अटक

दैनिक गोमन्तक

वेर्णा पोलिसांनी 37 वर्षीय ओडिशातील नायक प्रकाश सेन याला 1.10 लाख रुपयांच्या अंमली पदार्थ गांजासह अटक केली आहे. जुआरीनगर येथील उमिया हॅबिटॅट बिल्डिंगजवळील मोकळ्या भूखंडावर छापा टाकला असता नायक याच्याकडे 1.107 किलो गांजा असलेले 2 बॉक्स सापडले. यावेळी पोलिसांनी हा गांजा जप्त केला आहे. तसेच या तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत.

जुआरीनगर येथे अंमली पदार्थांची (Drugs) विक्री होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली, त्यानुसार पोलिसांनी पुढील तपास यंत्रणा हलवली आणि या तरुणाला रंगेहात पकडले. राज्यात अनेक ठिकाणी अंमली पदार्थ विकले जात असल्यामुळे अनेक सामाजिक संस्थांकडून पोलिसांच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उभे केले जात आहे. त्यामुळे पोलिस देखील सतर्क होऊन ढोस पावले उचलताना दिसत आहेत.

दरम्यान, अमली पदार्थ विरोधी विभागाने मडगाव येथे आज छापा टाकला. यावेळी छापा टाकून रियाझ शेख (37, नावेली) याला अटक करण्यात आली आहे. आरोपीकडून 4 लाखांचा 4 किलो गांजा जप्त करण्यात आला होता.

मडगाव (Margao) परिसरात अमली पदार्थ विकले जात असल्याची माहिती पोलिसांना (police) मिळताच पोलिसांनी छापा टाकून आरोपीला रंगेहाथ पकडले आहे. पोलीस अधीक्षक महेश गावकर व उपअधीक्षक तुषार वेर्णेकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई झाली. पूढील तपास पोलिस करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT