राज्यपालांनी निर्यात व्यवसायाबाबत केलं मोठ आवाहन

गोव्यातील निर्यात व्यवसायाला मोठ भविष्य; राज्यपाल
Goa governor calls for detailed study on export business in the state
Goa governor calls for detailed study on export business in the stateDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

गोव्याचे राज्यपाल पी एस श्रीधरन पिल्लई यांनी गोव्याच्या विकासासाठी सुधारणा आणि नवीन मार्ग शोधण्यावर भर देऊन राज्यातील निर्यात व्यवसायाचे तपशीलवार विश्लेषण करण्याचे आवाहन केले आहे. “गोव्यातील निर्यात व्यवसायाला मोठ भविष्य आहे. ज्यामुळे देशाच्या एकूण आर्थिक विकासात अधिक योगदान मिळेल. राज्यातील निर्यात (export) व्यवसाय सुधारणे आणि निर्यातीचे नवीन मार्ग शोधून त्याद्वारे राज्याचा विकास वाढवणे यावर अभ्यास करण्याची गरज आहे, अस मत पिल्लई यांनी व्यक्त केले आहे. ‘एक्सपोर्ट कॉन्क्लेव्ह गोवा-2022' या उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते.

Goa governor calls for detailed study on export business in the state
...अशी झाली गोव्याच्या राजधानीची स्थापना, जाणून घ्या रंजक इतिहास

दरम्यान, राज्यपाल पी. एस. श्रीधनर पिल्लई यांनी सुर्ल-सत्तरी येथे भेट देऊन तेथील निसर्गसौंदर्याचा आस्‍वाद घेतला होता. तसेच या गावाच्‍या नैसर्गिक विकाससाठी संधी असल्याचे मत व्यक्त केले होते.

यावेळी झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात सुर्लातील ग्रामस्थांनी गावाच्‍या व आपल्‍या समस्‍या, व्यथा राज्यपालांसमोर (Governor P. S. Sridhanaran Pillai) मांडल्या. त्‍यात जमीनमालकीचा विषय प्राधान्यक्रमाने मांडला. घराची जमिनही ग्रामस्थांच्या नावावर नसल्याने बऱ्याच अडचणी येतात. या जमिनी नावावर झाल्यास शेतीसाठी (Farm) त्याचा वापर करता येईल, असे ग्रामस्‍थांनी सांगितले. राज्‍यपालांनी त्‍यांच्‍या समस्‍या ऐकून घेतल्‍या व गावाचा पर्यटनदृष्‍ट्या विकास झाला तर स्‍थानिक युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, असे मत व्यक्त केले. राणे यांनी राज्यपालांचे स्वागत केले आणि सुर्ला (Surla) गावाला भेट दिल्याबद्दल त्‍यांचे आभार मानले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa High Court SIR hearing
Cooperative societies financial transparency
Goa River Pollution
Shivaji Maharaj Statue Headland Sada
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com