Traffic jam in Margao Dainik Gomantak
गोवा

काणकोणात चित्रीकरणामुळे वाहतुकीला अडथळा

परवानगीचा गैरवापर: मडगावला प्रवास करणाऱ्यांचा खोळंबा

दैनिक गोमन्तक

काणकोण: गोवा मनोरंजन सोसायटीने चित्रीकरणासाठी दिलेल्या परवानगीचा अर्जदाराकडून गैरवापर करण्यात आला आहे. या चित्रीकरणामुळे कारवार-मडगाव हमरस्त्यावरील मनोहर पर्रीकर बगल मार्गावरील वाहतुकीला अडथळा निर्माण झाला. त्यामुळे कामानिमित्त मडगावला प्रवास करणाऱ्या सरकारी कर्मचारी व अन्य प्रवाशांना त्रास सहन करावे लागले.

मिळालेल्या माहितीनुसार गोवा मनोरंजन सोसायटीने आज (13) सकाळी 7 ते रात्री 9 वाजेपर्यंत गालजीबाग-माशे रस्ता व पूल यावर चित्रीकरणासाठी पर्वरी येथील दिशा क्रिएशनचे दिलीप बोरकर यांना 38,600 शुल्क भरून काही अटींवर परवानगी दिली होती. त्यामध्ये काब द राम भूशीर, काब द राम गावचा रस्ता व वेळ्ळी रस्ता या भागाचा गुरुवार व शुक्रवारी सकाळी 7 ते 9 वाजेपर्यंत समावेश करण्यात आला होता.

आज सकाळी मनोहर पर्रीकर बगल मार्गाच्या गालजीबाग पुलावर चित्रीकरण सुरू असताना मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी होऊन वाहतूक ठप्प झाली. या चित्रीकरणासाठी परवानगी देताना गोवा मनोरंजन सोसायटीने संबंधित सर्व गावच्या पंचायतींना कळवले होते. मात्र गालजीबाग पुलाचा काही भाग लोलये पंचायत क्षेत्रात येत असूनही लोलये पंचायतीला कळवण्यात आले नाही, असे सरपंच सचिन नाईक यांनी सांगितले.

आज सकाळी मनोहर पर्रीकर बगलमार्गाच्या गालजीबाग पुलावर चित्रीकरण सुरू असताना मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी होऊन वाहतूक ठप्प झाली. या चित्रीकरणासाठी परवानगी देताना गोवा मनोरंजन सोसायटीने संबंधित सर्व गावच्या पंचायतींना कळवले होते. मात्र गालजीबाग पुलाचा काही भाग लोलये पंचायत क्षेत्रात येत असूनही लोलये पंचायतीला कळवण्यात आले नाही.

- सचिन नाईक, सरपंच

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rooftop Solar: राज्यातील 798 ग्राहकांना शून्‍य रुपये वीज बिल; 1,304 घरांच्‍या छतांवर 'रुफ टॉप सोलर'

PF Withdrawal: EPFO चा ऐतिहासिक निर्णय: आता PF चे पैसे थेट ATM आणि UPI द्वारे काढता येणार!

Nanoda House Fire: नानोड्यात घराला आग; लग्न सोहळ्यासाठी ठेवलेले अडीच लाख रुपये भस्मसात, 10 लाखांच्या मालमत्तेची हानी

Goa Politics: मनोज परब यांच्‍यामुळेच युती झाली नाही! काँग्रेस–फॉरवर्ड युतीला जनता स्‍वीकारणार - माणिकराव ठाकरे

ZP ELection 2025: प्रचाराचा आज अखेरचा दिवस, भाजप, काँग्रेसच्‍या दिग्गजांकडून 'पायाला भिंगरी'

SCROLL FOR NEXT