CM Pramod Sawant Dainik Gomantak
गोवा

OBC Reservation : 'गोव्यात ओबीसी आरक्षण ट्रिपल टेस्टनुसारच'

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचं विधानसभेत स्पष्टीकरण; निवडणूक आयोगावर सर्वपक्षीयांची नाराजी

आदित्य जोशी

पणजी : गोव्यात पंचायत निवडणुकींसाठी निवडणूक आयोगाने जाहीर केलेलं ओबीसी आरक्षण हे ट्रिपल टेस्टनुसारच असल्याचं मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी स्पष्ट केलं आहे. ओबीसी आरक्षण जाहीर केल्यानंतर त्याला कोर्टात आव्हान देण्यात आलं आहे. मात्र ओबीसी आरक्षणाच्या घोळावरुन विरोधकच नाही तर सत्ताधारी पक्षातील आमदारांनीही नाराजी व्यक्त केली आहे.

अधिवेशनादरम्यान ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन विरोधक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. निवडणूक आयोगावर विरोधकांसह सत्ताधारी आमदारांनीही नाराजी व्यक्त केली. लोकसंख्येचा विचार करुन ओबीसी आरक्षण न दिल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. मात्र मुख्यमंत्र्यांनी निवडणूक आयोगाने ट्रिपल टेस्टनुसारच आरक्षण दिल्याचं स्पष्ट केलं आहे.

पंचायत निवडणुकांमध्ये 307 प्रभागात ओबीसींना आरक्षण दिल्याची दुरुस्ती अधिसूचना बुधवारी निवडणूक आयोगाने जारी केली होती. सरकारने सादर केलेला इतर मागासवर्गीयांचा डाटा ग्राह्य म्हणून राज्य निवडणूक आयोगाने ओबीसींना निवडणुकीत 21 टक्के आरक्षण जाहीर केले. आरक्षणासाठी 19 पोटजातींची अधिसूचना मंगळवारी पंचायत संचालनालयाने काढली होती.

मात्र या आरक्षणाविरोधात मुंंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात 4 याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. या याचिकांवर काल सोमवारी सुनावणी झाली. यावेळी कोर्टाने निवडणूक आयोगाला आपली बाजू मांडण्यासाठी आज मंगळवार संध्याकाळपर्यंतचा वेळ दिला आहे. उद्या पुन्हा या याचिकांवर सुनावणी होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बनणार 6 शक्तिशाली राजयोग! 'या' राशींची तिजोरी पैशांनी भरणार; होणार अफाट धन वर्षाव

Weather Update: ऑगस्टमध्ये समाधानकारक पाऊस, सर्वाधिक वाळपईत; जुलैमधील पावसाचा तुटवडा मात्र कायम

Marcel Road Issue: माशेलात 'वर्दळीचा' रस्ता धोकादायक, खड्ड्यांमुळे वाहतुकीला अडथळा; पावसात दुचाकीस्वारांसमोर मोठे संकट

Panaji: थकीत घरपट्टीचा फटका भाडेकरूंना; उत्पन्नाचा दाखला मिळविताना भाडेकरूंच्या मुलांची मोठी कसरत

Police Attack Viral Video: पीएसआयचा गळा आवळला, लोखंडी साखळीने हल्ला... लखनऊमध्ये अतिक्रमण हटवताना राडा; दोन महिलांसह 6 जणांना बेड्या

SCROLL FOR NEXT