OBC demands government Not received yet Dainik Gomantak
गोवा

Goa News: ‘ओबीसीं’च्या मागण्यांबाबत सरकारकडून चालढकल

Goa News: ओबीसी महासंघाच्या चाळीसपैकी केवळ दोनच मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत.

दैनिक गोमन्तक

Goa News: राज्यात 65 टक्के लोक असलेल्या एकोणीस जातींच्या ओबीसी महासंघाच्या मागण्या मान्य करण्याबाबत सरकारकडून चालढकल केली जात असून पदव्युत्तर वैद्यकीय महाविद्यालय अभ्यासक्रमासाठीचे आरक्षण अद्याप मिळालेले नाही, तरीही येत्या 11 रोजी होणाऱ्या तिसऱ्या फेरीत तरी हे आरक्षण द्यावे, अशी मागणी राष्ट्रीय ओबीसी महासंघाने फोंड्यात आज (शुक्रवारी) केली.

ओबीसी महासंघाचे गोव्यातील प्रमुख मधू नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली ओबीसींच्या विविध विषयांवर यावेळी चर्चा करण्यात आली, त्यानंतर राज्यातील चाळीसही मतदारसंघात मंडळ अभियान यात्रा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. ओबीसी महासंघाच्या चाळीसपैकी केवळ दोनच मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत, अजून अडतीस मागण्या प्रलंबित असून त्या पूर्ण करण्यासाठी ओबीसी महासंघ पुढे सरसावला असून राज्यात यासंबंधी जनजागृती करण्यात येत आहे. चाळीसही मतदारसंघात विविध समित्या कार्यरत असून गरजेनुसार संबंधित मतदारसंघात हे अभियान सुरू करण्यात येणार आहे.

फोंड्यातील या पत्रकार परिषदेला ओबीसी महासंघाचे नीतिन चोपडेकर, प्रेमानंद शेटकर, विनोद किनळेकर, सूर्यकांत गोसावी, नीळकंठनाईक, विवेकानंद वेरेकर, प्रकाश नाईक, वामन वैद्य व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

नवीन वैद्यकीय महाविद्यालय सुरू करावे

राज्यातील ओबीसी महासंघाच्या अनुसुचित जाती जमातींसह विविध मागण्या सरकारपुढे ठेवण्यात आल्या आहेत, मात्र अजून त्यावर कोणतीच कार्यवाही झालेली नाही, असे या पत्रकार परिषदेत सांगण्यात आले. विशेष म्हणजे पदव्युत्तर अभ्यासक्रमात आरक्षणाची मागणी प्रलंबित असून गेल्या चोविस वर्षांत एकूण चारशे जागांसाठी ओबीसी विद्यार्थी मुकल्याने सरकारने नवीन वैद्यकीय महाविद्यालय सुरू करून ही संधी द्यावी, असेही मत व्यक्त करण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Weekly Horoscope: छोटीशी मेहनतच तुम्हाला मोठ्या यशाकडे घेऊन जाईल 'या' राशींसाठी हा आठवडा ठरणार खास; जाणून घ्या तुमचे भविष्य

Chimbel: '13 घरे नकाशातून केली गायब'! चिंबलवासीयांचा आरोप; 4.5 लाख चौमी जमीन हडप करण्‍याचा डाव असल्याचा दावा

Goa Assmbly Live: कदंब आणि कारमधील अपघातामुळे प्रवाशांना विलंब

Goa Politics: खरी कुजबुज; युरी, विजय गप्‍प बसणार?

Ukraine Attack: युक्रेनचा रशियाच्या तेल गोदामावर हल्ला! स्फोटानंतर भडकली आग; रशियाने डागली 7 क्षेपणास्त्रे, 76 ड्रोन

SCROLL FOR NEXT