Goa Robbery Incident: गेस्ट हाऊसमध्ये घुसून जर्मन पर्यटकाची लूट, 18 वर्षाच्या भामट्याला बेळगावात अटक; कळंगुट पोलिसांची कारवाई

German Tourist Robbed in Calangute: गोव्यातील प्रसिद्ध कळंगुट परिसरात एका जर्मन पर्यटकाला लुटणाऱ्या आरोपीला जेरबंद करण्यात पोलिसांना मोठे यश आले.
German Tourist Robbed in Calangute
Goa Robbery IncidentDainik Gomantak
Published on
Updated on

कळंगुट: गोव्यातील प्रसिद्ध कळंगुट परिसरात एका जर्मन पर्यटकाला लुटणाऱ्या आरोपीला जेरबंद करण्यात पोलिसांना मोठे यश आले. अवघ्या 18 वर्षांच्या या आरोपीने पर्यटकाच्या खोलीत शिरुन जबरदस्तीने सोन्याची साखळी हिसकावून नेली होती. याप्रकरणी कळंगुट पोलिसांनी तत्परता दाखवत आरोपीला अटक करुन चोरीला गेलेला मुद्देमालही जप्त केला.

नेमकी घटना काय?

मिळालेल्या माहितीनुसार, 11 डिसेंबर 2025 रोजी बागा-कळंगुट येथील एका गेस्ट हाऊसमध्ये मुक्कासाला असलेल्या एका जर्मन पर्यटकाने पोलिसांत तक्रार दाखल केली होती. एक अज्ञात तरुण त्याच्या खोलीत जबरदस्तीने घुसला आणि त्याने पर्यटकाच्या गळ्यातील सुमारे 20 ग्रॅम वजनाची सोन्याची साखळी हिसकावून पळ काढला. या सोन्याच्या साखळीची अंदाजे किंमत 2 लाख 40 हजार रुपये इतकी होती. पर्यटकाने दिलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपासाची चक्रे फिरवली.

German Tourist Robbed in Calangute
Goa Crime: काळजाचा थरकाप उडवणारी घटना! वाळपईत महिलेचं अपहरण करुन नराधमानं केलं निंदनीय कृत्य

कर्नाटकातून आरोपीला ठोकल्या बेड्या

तपासादरम्यान मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे, पोलिसांनी नवीन मडीवालर (18 वर्षे) या तरुणाला संशयावरुन ताब्यात घेतले. आरोपी मूळचा बेळगाव (कर्नाटक) येथील रहिवासी आहे. सखोल चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्यानंतर कळंगुट पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम 304(2) अंतर्गत गुन्हा नोंदवून त्याला अधिकृतरित्या अटक केली. आरोपीच्या अटकेनंतर कळंगुट पोलिसांचे एक पथक बेळगावला रवाना झाले. तेथून चोरीला गेलेली ती 2.40 लाख रुपयांची सोन्याची साखळी यशस्वीरित्या हस्तगत करण्यात आली.

German Tourist Robbed in Calangute
Goa Crime: गोव्यातील 16 वर्षीय शाळकरी मुलीवर अपहरण करुन लैंगिक अत्याचार; महाराष्ट्रातील 39 वर्षीय नराधमाचा कोर्टाने फेटाळला जामीन

तपास पथक आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन

ही यशस्वी कारवाई पोलीस उपनिरीक्षक किरण नाईक यांच्या नेतृत्वाखालील पथकाने केली. या पथकात हेड कॉन्स्टेबल विद्यानंद आमोणकर, पोलीस कॉन्स्टेबल विजय नाईक, अमीर गरद, राजेश कांदोळकर, राज परब, गणपत तिलोजी, गौरीश करबोटकर, स्मिता बांदेकर आणि संदेश कुंभार यांचा समावेश होता. संपूर्ण तपास कळंगुट पोलीस स्थानकाचे निरीक्षक परेश नाईक यांच्या देखरेखीखाली आणि पर्वरीचे उपअधीक्षक विश्वेश कर्पे तसेच उत्तर गोवा पोलीस अधीक्षक हरिश्चंद्र मडकईकर यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण करण्यात आला. गोव्यात येणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षेबाबत पोलीस प्रशासन अत्यंत सतर्क असल्याचे या कारवाईतून पुन्हा एकदा सिद्ध झाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com