गोव्यात नाताळची जय्यत तयारी! बाजारपेठांमध्ये 'ख्रिसमस'ची धूम; 10 फुटी झाडांनी वेधलं लक्ष

Christmas markets Goa: पारंपरिक सजावटीला आधुनिकतेची जोड देण्याकडे गोवेकरांचा कल दिसून येत आहे
Natal celebrations
Natal celebrationsDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: डिसेंबर महिना सुरू होताच गोव्यात नाताळचा उत्साह दरवळू लागला आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यात सणाचे वारे वाहू लागले असून, बाजारपेठा रंगीबेरंगी चांदण्या, दिव्यांच्या माळा आणि ख्रिसमस ट्रीने सजल्या आहेत. यंदा नाताळची खरेदी लवकर सुरू झाली असून, पणजीपासून मडगावपर्यंतच्या बाजारपेठांमध्ये ग्राहकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. पारंपरिक सजावटीला आधुनिकतेची जोड देण्याकडे गोवेकरांचा कल दिसून येत आहे.

बाजारपेठांमध्ये नवा 'स्टॉक' आणि ट्रेंड

पणजीमधील विक्रेत्यांनी सांगितले की, यंदा नाताळचे साहित्य नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यातच दाखल झाले. यामध्ये केवळ झाडे आणि चांदण्याच नाहीत, तर नाताळची थीम असलेले मग्ज, प्लेट्स आणि घराच्या सजावटीच्या विशेष वस्तूंचाही समावेश असून ग्राहकांमध्ये नवीन डिझाईन्स आणि पॅटर्न्सबद्दल विशेष उत्सुकता आहे.

१० फुटी ख्रिसमस ट्रीला मोठी पसंती

यंदा बाजारपेठेत ६ फुटांपासून ते १० फुटांपर्यंतच्या उंच ख्रिसमस ट्रीचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. अनेक कुटुंबे आता मोठ्या झाडांना पसंती देत असून, त्यांच्याशी जुळणारी 'को-ऑर्डिनेटेड' सजावट खरेदी करत आहेत.

मडगावमधील दुकान मालकांनी सांगितले की, अनेक वर्षांचा अनुभव असल्यामुळे लोकांना नेमके काय हवे आहे, हे ओळखून आम्ही आमचा संग्रह तयार केला आहे. त्यांच्या दुकानात पारंपरिक हस्तकलेच्या वस्तूंसोबतच आधुनिक शोभिवंत वस्तूही ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहेत.

Natal celebrations
Christmas in Goa: बिग फूटमध्ये साकारलीये अनोखी कारागिरी; गोव्यात आहात मग लोटलीला जाऊन आलात का?

गोव्याच्या संस्कृतीचे दर्शन

नाताळ हा गोव्याच्या संस्कृतीचा एक अविभाज्य भाग आहे. घराघरांमध्ये लागणारे आकाशदिवे, गोठ्याची तयारी आणि रोषणाई यामुळे संपूर्ण राज्य प्रकाशात न्हाऊन निघाले आहे. साहित्याची विक्री इतक्या वेगाने होत आहे की, अनेक दुकानांमधील स्टॉक संपत आलाय. पर्यटनाचा हंगाम आणि नाताळचा उत्सव यामुळे गोव्याच्या बाजारपेठांमध्ये आर्थिक उलाढालही मोठ्या प्रमाणावर होत असून, सर्वत्र आनंदचे वातावरण आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com