Aleixo Sequeira X
गोवा

Nuvem: नुवेतील भाडेकरूंची तपासणी तीव्र करा! मंत्री सिक्वेरांचा आदेश; ड्रग्स व्यवहारांचा बिमोड करण्याचेही निर्देश

Nuvem Tenant Verification: जिल्हाधिकारी कार्यालयात लोकांची गाऱ्हाणी ऐकण्यासाठी आल्यावेळी मडगाव स्थानकातील पोलिस अधिकारी त्यांना भेटले, त्यावेळी त्यांनी हा आदेश दिला.

Sameer Panditrao

Aleixo Sequeira Nuvem Tenant Verification

सासष्टी: नुवे मतदारसंघात भाडेकरुंची तपासणी तीव्र करण्याचा आदेश पर्यावरण तथा कायदा मंत्री आलेक्स सिक्वेरा यांनी आज पोलिसांना दिला आहे.आज जिल्हाधिकारी कार्यालयात लोकांची गाऱ्हाणी ऐकण्यासाठी आल्यावेळी मडगाव स्थानकातील पोलिस अधिकारी त्यांना भेटले, त्यावेळी त्यांनी हा आदेश दिला.

पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितले की, केवळ तपासणी नव्हे तर ड्रग्स व्यवहारसुद्धा मोठ्या प्रमाणात चालल्याने त्याचा बिमोड करण्यासही त्यांनी पोलिसांना सांगितले आहे. आजपासूनच ही मोहीम उघडण्यात येईल, असे मंत्री सिक्वेरा यानी सांगितले.

सोनसोडो येधील कब्रस्तानाचा प्रश्न जटील होत आहे, असे सांगून मंत्री सिक्वेरा यानी सांगितले की आज आपण मडगाव नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांशी या संदर्भात बोललो आहे. कब्रस्तानासाठी दिलेली जागा ही सर्व धर्मियांसाठी असुन बोर्डा येथील चर्च व्यवस्थापनाने तिथे सभागृह बांधले आहे. त्यामुळे तिथे व कब्रस्थानकडे जाण्यासाठी रस्त्याचा प्रश्न उपस्थित झाला आहे. आपण या संदर्भातील फाईल मागितली असून सोमवारी परत अधिकाऱ्यांशी चर्चा केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.

खाजन नोंदणी शुल्काबद्दल नाराजी

खाजन जमिनीत मासळी पकडण्यासह भाज्या, फुले यांची लागवड केली जाते. त्यासाठी पूर्वी नोंदणीसाठी १ टक्का शुल्क आकारला जात असे. आता सरकारने हा शुल्क २० टक्के केला आहे. त्यामुळे काही शेतकऱ्यांनी हे शुल्क जास्त असल्याचे आपल्याला भेटून सांगितले. त्यानी सांगितले की खाजन जमिन तीन वर्षासाठी भाडेतत्वावर घेतली जाते. पण दोनच वर्षे त्यातून उत्पन्न काढले जाते व तिसऱ्या वर्षासाठी जी जमीन अधिक सुपीक होण्यासाठी वापराविना ठेवली जाते. पूर्वी ही जमीन घेतल्यावर शुल्क हप्त्याने भरण्याची पद्धत होती. आता सरकारने सुरवातीलाच पूर्ण रक्कम भरावी, असा निर्णय घेतला आहे. आपण त्यांना त्यावर सहानुभूतीपूर्वक विचार करणार,असे आश्वासन दिल्याचे मंत्री सिक्वेरा यांनी सांगितले.

कार्निव्हल संचलनाची धास्ती

गोव्यात कार्निव्हल १ ते ४ मार्च रोजी साजरा केला जाणार आहे. फातोर्ड्याचे आमदार विजय सरदेसाई यांनी ४ रोजी फातोर्ड्यात चित्ररथांचे संचलन आयोजित केले आहे. त्याच दिवशी फातोर्ड्यात ‘आयएसएल’ स्पर्घेतील गोवा विरूद्ध मोहमेड्डन संघांमध्ये सामना होणार आहे. त्यामुळे वाहतूक, कायदा व सुव्यवस्था या बद्दल आज काही जणांनी धास्ती व चिंता व्यक्त केली. मात्र, जिल्हाधिकाऱ्यांनी या संदर्भात सर्व काळजी घेऊ असे सांगितले, असेही मंत्री सिक्वेरा यांनी स्पष्ट केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Google New AI Feature: गुगलचं नवं 'एआय' फीचर लाँच; माहिती शोधणं होणार अधिक अचूक

Travel Horoscope: दूरचा प्रवास करताय? काही राशींसाठी आजचा दिवस लाभदायक, काहींनी जपून राहावे; वाचा तुमचं भविष्य

Goa: सभागृहावर पडले झाड, 2 वाहनांचे नुकसान; पावसामुळे अनेक ठिकाणी पडझड

Ganesh Chitrashala: 80 वर्षे जुनी चित्रशाळा, आजही करते गणरायाची सेवा; नातू-पणतूनी ठेवली परंपरा सुरु

Goa Live News: 29 जुलैपर्यंत गोव्यात पावसाचा यलो अलर्ट

SCROLL FOR NEXT