पर्वरी
आज नेरुल गावात तातडीने सकाळी ११ वाजता आमदार जयेश साळगावकर यांनी पंचायत मंडळाची बैठक घेतली. या बैठकीत जिल्हाधिकारी अक्षय पोतेकर, उपजिल्हाधिकारी मामू हेगे, मामलेदार राजाराम परब, पर्वरी पोलिस निरीक्षक निनाद देऊळकर, वीज खात्यातील अभियंता संदीप व बेनी, सार्वजनिक बांधकाम खात्याचे प्रमुख अभियंता सी. नेवरेकर, डॉ. नाझारेथ व सरपंच रेश्मा कळंगुटकर, उपसरपंच अभिजित बाणावलीकर, पंच व इतर ग्रामस्थ उपस्थित होते.
या बैठकीत नेरूल - फट्टावाडा २० कलमी वसाहतीत कोविडचा प्रसार रोखण्यासाठी कोणकोणती उपाययोजना करण्यात आली याची सविस्तर माहिती देण्यात आली. देवकीकृपा चाळ व २० कलमी वसाहत पूर्णपणे ‘सील’ केले आहे. नेरूल मासळी बाजार बंद करण्यात आला आहे. नागरिकांनी सुरक्षित अंतर, मास्क व सॅनिटायझरचा वापर करावा. लोकांनी या निर्णयाचे काटेकोर पालन करावे व स्वतःहून घरात बसून राहावे, असे आवहान आमदार जयेश साळगावकर यांनी केले.
काही प्रभागात ‘मायक्रो कंटेन्मेंट झोन’ जाहीर
नेरूल - फट्टावाडा येथे अचानक रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्यामुळे उतर गोवा जिल्हाधिकाऱ्यांनी यासंदर्भात एक आदेश जारी करून प्रभाग क्रमांक १-१८, १९/१, ७६, ७७, ६९, ७१, ७२, ७३, ७४/ए, ७४/वी, २०/एससी या परिसरात ‘मायक्रो कंटेन्मेंट झोन’ जाहीर करण्यात आला आहे. तसेच वसाहतीत रुग्णांची संख्या वाढत असल्याचे नेरूल पंचायतीने पुढाकार घेऊन नेरूल गावात सर्वत्र गाडी फिरवून कोरोनावर नियंत्रण ठेवण्यासाठी स्वतःहून काळजी घ्यावी. तसेच सर्व मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करून दुकाने, रेशन दुकाने, बँक, दवाखाने पुढील आठ दिवस सकाळी ७ ते दुपारी १२ पर्यंत खुले ठेवून सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
संपादन - यशवंत पाटील
|