BITS Pilani Controversy Dainik Gomantak
गोवा

BITS Pilani Controversy: बीट्स पिलानी प्रकरणाचा छडा लावा, अन्यथा...; एनएसयुआयचा संतप्त इशारा, राज्यपालांच्या हस्तक्षेपासाठी साकडे

NSUI demand judicial probe BITS Pilani: सरकार ज्या प्रकारे बिट्स पिलानीमध्ये विद्यार्थ्यांच्या मृत्यूसंबंधी धिम्यागतीने कारवाई करत आहे, ते पाहता आम्हांला विश्‍वासच राहिला नाही.

दैनिक गोमन्तक डिजिटल

पणजी: सरकार ज्या प्रकारे बिट्स पिलानीमध्ये विद्यार्थ्यांच्या मृत्यूसंबंधी धिम्यागतीने कारवाई करत आहे, ते पाहता आम्हांला विश्‍वासच राहिला नाही. त्यामुळे या प्रकरणी न्यायालयीन चौकशी करण्यात यावी, अशी मागणी एनएसयुआयतर्फे राज्यपाल पुसापती अशोक गजपती राजू यांना निवेदन देऊन करण्यात आली. यावेळी एनएसयुआयचे सचिव कुमार गवळी, झयद शेख व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

यासंदर्भात बोलताना कुमार गवळी म्हणाले, बिट्स पिलानीमध्ये आत्तापर्यंत सहा विद्यार्थ्यांच्या मृत्यू झाला आहे. ही आत्महत्या आहे, की खून याबाबत स्पष्टता हवी.जर सरकारने (Government) योग्य कारवाई केली नाही तर बिट्स पिलानीचे कामकाज चालू देणार नसल्याच्या इशारा यावेळी त्यांनी दिला. बिट्स पिलानीत आत्तापर्यंत सहा जणांचे मृत्यू झाले आहेत. या आत्महत्या की घातपात हे कळायला हवे, तर फॉरेन्सीक रिपोर्ट समोर येणे गरजेचे आहे. परंतु अजूनही एकाही प्रकरणाचा रिपोर्ट समोर आला नाही. हे रिपोर्ट अंधारात ठेवण्याचे नेमके कारण काय? कोणाला वाचविण्याचा हा प्रयत्न आहे, असा प्रश्‍न झयद शेख यांनी केला.

त्या मद्यालयावर कारवाई करा!

कोणत्याही शिक्षण संस्थेच्या १०० मीटर आवारात मद्यालय असू नये, असा कायदा आहे परंतु बिट्स पिलानीच्या आवारात मद्यालय आहे. या मद्यालयाच्या माध्यमातून अवैध गोष्टी चालतात असा संशय आहे. या मद्यालयामुळे विद्यार्थ्यांवर परिणाम होत आहे, त्यामुळे योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी मागणी गवळी यांनी यावेळी केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Trigrahi Yoga 2026: सूर्य, मंगळ आणि बुधाचा 'त्रैग्रही योग'; 'या' 5 राशींना मिळणार अमाप संपत्ती आणि प्रगतीची सुवर्णसंधी!

'मोसाद'शी संबंधित हेराला इराणमध्ये फाशी, हिंसाचाराचा ठेवला ठपका; जागतिक स्तरावर संतापाची लाट, पण तेहरान ठाम!

विमान उडाले, पण मुले खालीच राहिली! विसरभोळेपणाचा कळस आणि मातेचा टाहो; तुमची स्मरणशक्ती तुम्हाला दगा तर देत नाही ना?

Sreesanth: "भज्जीनं थप्पड कांड विकलं!" श्रीसंतचा हरभजन सिंहवर कोट्यवधींच्या कमाईचा आरोप; क्रिकेट जगतात खळबळ

Bank Robbery: 10 मिनिटात 7 कोटींचं सोनं आणि 5 लाखांची रोकड केली लंपास! झारखंडमध्ये बँकेवर दरोडेखोरांचा छापा; कर्मचारी-ग्राहकांना ठेवलं ओलीस

SCROLL FOR NEXT