NSS Camp Shree Kamleshwar Higher Secondary School Dainik Gomantak
गोवा

Pernem News : ‘एनएसएस’ शिबिरांतून मिळते मुलांच्‍या जीवनाला योग्‍य दिशा: अनुराधा कोरगावकर

Pernem News : कमळेश्‍‍वर विद्यालयाच्‍या शिबिराला प्रतिसाद

गोमन्तक डिजिटल टीम

Pernem News : पेडणे, राष्ट्रीय सेवा योजना शिबिरातून विद्यार्थ्यांमध्‍ये शिस्त आणि आत्मविश्‍‍वास निर्माण होतो. त्यांच्या जीवनाला सुयोग्य दिशा मिळते, असे प्रतिपादन कोरगावच्या सरपंच अनुराधा कोरगावकर यांनी केले.

कोरगाव येथील श्री कमळेश्‍‍वर उच्च मध्यमिक विद्यालयाच्या निवासी राष्ट्रीय सेवा योजना शिबिराच्या उद्‌घाटनप्रसंगी प्रमुख पाहुण्या म्हणून त्‍या बोलत होत्या.

या सात दिवशीय निवासी शिबिराच्‍या उद्‌घाटन कार्यक्रमाला व्यासपीठावर खास निमंत्रित पाहुणे कोरगावचे पंच उमेश च्यारी, श्री कमळेशश्‍‍वर शैक्षणिक संस्थेचे सचिव नीळकंठ थळी, मुख्याध्यापक आत्माजी नाईक, प्रा. जुही थळी, राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी दीपश्री सोपटे, विठोबा बगळी, विद्यार्थी प्रतिनिधी समेश गावडे, रिया केरकर यांची उपस्थिती होती. त्‍यांनीही विचार मांडले.

कार्यक्रमाची सुरूवात स्वागतगीताने झाली. निशा च्यारी (हार्मोनियम) व समेश गावडे (तबला) यांनी साथसंगत केली.

समेश गावडे, रिया केरकर यांनी व्यासपीठावरील मान्यवरांना पुष्पगुच्छ प्रदान केले. प्रा. जुही थळी यांनी स्वागत आणि प्रास्ताविक, विठोबा बगळी यांनी सूत्रसंचालन तर दीपश्री सोपटे यांनी शेवटी आभार मानले.

विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय सेवा योजना शिबिरांचे आयोजन ही खरोखरच चांगली गोष्‍ट आहे. कारण अशा शिबिरांतून विद्यार्थ्यांच्‍या कलागुणांना न्‍याय मिळतो. त्‍यांना आपले व्‍यक्तिमत्‍व सुधारता येते.

- अनुराधा कोरगावकर, सरपंच (कोरगाव)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT