Canacona Railway  Dainik Gomanak
गोवा

Canacona: आता 'या' दोन एक्सप्रेस रेल्वेगाड्याही काणकोणमध्ये थांबणार

रेल्वे मंत्रालयाने दिली मान्यता

दैनिक गोमन्तक डिजिटल

Canacona: काणकोण रेल्वे स्थानकावर आता आणखी दोन एक्सप्रेस रेल्वेगाड्याही थांबणार आहेत. नेत्रावती एक्सप्रेस आणि गांधीधाम एक्सप्रेस या रेल्वेगाड्या आता काणकोण स्थानकावर थांबवण्यास रेल्वे मंत्रालयाने मान्यता दिली आहे. याबाबत स्थानिकांमधून मागणी केली जात होती.

नेत्रावती एक्सप्रेस ही मुंबई ते तिरूअनंतपुरम (केरळ) या दोन स्थानकांदरम्यान धावणारी रेल्वेगाडी आहे. तर गांधीधाम एक्सप्रेस ही गुजरातच्या कच्छमधील गांधीधामपासून तामिळनाडूतील नागरकोईल या स्थानकांदरम्यान धावते.

नेत्रावती एक्सप्रेस रेल्वे 2 एप्रिलपासून तर गांधीधाम एक्सप्रेस 8 एप्रिलपासून काणकोण रेल्वे स्थानकावर थांबा घेणार आहेत. या संदर्भात रेल्वे बोर्डाचे संयुक्त संचालक विवेक कुमार सिन्हा यांनी आदेश काढला आहे.

मात्र काणकोण रेल्वे स्थानकावर रेल्वे तिकीटांच्या खपावर लक्ष ठेवून पाच महिन्यानंतर रेल्वे बोर्डाला अहवाल कळविण्याचे निर्देश रेल्वे अधिकाऱ्यांना दिले आहेत. काणकोणमधील जेष्ठ नागरिक व समविचारी नागरिकांनी रेल्वे थांबण्यासाठी गेल्या वर्षापासून निवेदने दिली होती.

त्याचप्रमाणे आंदोलने छेडली होती. गेल्या महिन्यात गोवा विधानसभेचे सभापती रमेश तवडकर तसेच नगराध्यक्ष रमाकांत नाईक-गावकर व शंभा नाईक-देसाई यांनी दिल्ली येथे जाऊन रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेतली होती.

त्यावेळी रेल्वे मंत्र्यानी सभापतींना रेल्वे काणकोण स्थानकावर थांबवण्याचे आश्वासन दिले होते. त्या आश्वासनाची पूर्तता आता करण्यात आली आहे.

काणकोण तालुका हा किनारी पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे. त्यामुळे देशी व परदेशी पर्यटकाबरोबरच स्थानिक प्रवाशांच्या सोयीसाठी लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्या या स्थानकावर थांबणे गरजेचे होते. कोरोना काळापूर्वी या गाड्या काणकोण रेल्वे स्थानकावर थांबत होत्या.

मात्र कोरोनाकाळात तिकीट विक्री होत नसल्याने थांबा रद्द करण्यात आला होता. त्यावेळी येथील प्रवाशांना कारवार किंवा मडगाव रेल्वे स्थानकावर जावे लागत होते.

मात्र या रेल्वे स्थानकावर रेल्वे आरक्षणाची सोय नाही. रेल्वे बोर्डाने ती जबाबदारी पोस्ट ऑफीसकडे दिली आहे. त्यासाठी रेल्वे स्थानकावर आरक्षणाची सोय पूर्ववत करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sancoale: पहिल्या पत्नीला घटस्फोट दिला, खोटं सांगून केलं दुसरं लग्न; सांकवाळच्या प्रभारी सरपंचांवर गुन्हा दाखल

Goa Politics: '..राहुल गांधींकडे सर्व प्रकार मांडणार'! अमित पाटकर यांनी दिली माहिती; काँग्रेस, NSUI मधील वाद शिगेला

Bits Pilani: ‘बिट्स पिलानी’त विद्यार्थी मृत,कॅम्पसमधील धक्कादायक घटना; पोलिसांचा चहूबाजूंनी तपास

Rashi Bhavishya 17 August 2025: करिअरमध्ये प्रगती, प्रवासाचे योग ; मात्र आरोग्याकडे लक्ष द्या

"तीन वर्षांत 9 विद्यार्थ्यांनी अभ्यासाच्या दडपणामुळे आयुष्य संपवलं, अभ्यासक्रमाचा फेरविचार करावा", आलेमाव यांची सरकारकडे मागणी

SCROLL FOR NEXT