Tree cutting in goa Dainik gomantak
गोवा

Goa Government: आता झाडे तोडण्यापुर्वी सरकारलाही घ्यावी लागणार परवानगी; वन विभागाची अधिसूचना प्रसिद्ध

वृक्ष प्राधिकरणाकडे प्रस्ताव पाठवावा लागणार

Akshay Nirmale

Goa Government on Tree Cutting: आता 100 किंवा त्याहून अधिक झाडे तोडण्याबाबतचा निर्णय वृक्ष प्राधिकरण घेणार आहे. वनविभागाचे अवर सचिव (वन) नाथीन आरावजो यांनी 15 जून रोजीच याबाबतची अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. त्यानुसार झाडे तोडण्याचे कोणतेही प्रस्ताव आता वृक्ष प्राधिकरणाकडे पाठवले जातील.

“गोवा प्रिझर्वेशन ऑफ ट्रीज अॅक्ट, 1984 च्या कलम 35 अन्वये प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून आणि वेळोवेळी सुधारणा केल्यानुसार, सरकारने ही अधिसूचना काढली आहे.

इमारतींचे बांधकाम, रस्ते बांधकाम, कारखाने, सिंचनाची कामे, इलेक्ट्रिक, टेलिफोन, टेलिग्राफिक आणि इतर वीजवाहिन्या टाकण्याच्या कामावेळी कुठल्याही विभागाला 100 हून अधिक झाडे तोडायची असल्यास तसे सर्व प्रस्ताव आता तत्काळ प्रभावाने वृक्ष प्राधिकरणाकडे पाठवले जावेत, असे निर्देश सरकारने दिले असल्याचे अधिसूचनेत नमूद करण्यात आले आहे.

दरम्यान, वृक्ष प्राधिकरण 1998 मध्ये स्थापन झाले होते पण 2012 पासून ते कार्यक्षम नाही. त्यामुळे गोव्यातील हरित क्षेत्र कमी होत चालल्याचे बोलले जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa High Court: हॉटेल एफएआर घोटाळा: 2 आठवड्यात प्रतिज्ञापत्र सादर करा, अन्यथा मुख्य नगरनियोजकांना कोर्टात हजर राहावे लागेल

Goa Rough sea: बेतुल येथील फ्लोटिंग जेटी कोसळली; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण, धोकादायक जेटी हटवण्याची मागणी

Meta AI Smart Glass: तुमची प्रत्येक हालचाल, प्रत्येक संवाद एआयच्या नजरेत? मेटा आणतंय 'सुपर-सेन्सिंग' चष्मा, पाहणाऱ्या-ऐकणाऱ्या गॅझेटमुळे गोपनीयतेवर प्रश्नचिन्ह

Goa Hotel Death: फातोर्ड्यात खळबळ! नोएडातील व्यावसायिकाचा हॉटेलमध्ये संशयास्पद मृत्यू, पुढील तपास सुरू

Goa crime: एडिसन सोरंग खूनप्रकरणी दोघांना जन्मठेप; किरकोळ वादाचे हत्येत रुपांतर, फावड्याने वार करून मित्राला संपविले

SCROLL FOR NEXT