Pay Parking Dainik Gomantak
गोवा

Pay Parking: फोंडा शहरात आता ‘पे पार्किंग’!

Pay Parking: पालिका बैठकीत शिक्कामोर्तब: इंदिरा मार्केट दुकानांचा होणार फेरलिलाव

दैनिक गोमन्तक

Pay Parking: फोंडा पालिकेच्या शहर भागात पे पार्किंग सुरू करण्याचा निर्णय पालिकेच्या बैठकीत झाला. शहरातील बेशिस्त पार्किंगला त्यामुळे आळा बसेल, असे मत पालिकेतर्फे व्यक्त करण्यात आले असून दुचाकींना प्रती तास पाच तर चारचाकींना प्रती तास दहा रुपये दर निर्धारित केले आहेत.

पार्किंगबरोबरच इतर अनेक विषयही चर्चेला आले. इंदिरा मार्केट संकुलातील दुकानांचा फेरलिलाव करण्याचा ठरावही घेण्यात आला.

मंगळवारी झालेल्या या बैठकीच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष रितेश नाईक तसेच इतर नगरसेवक व पालिका मुख्याधिकारी आणि अन्य अधिकारी उपस्थित होते.

फोंडा शहरात वाढलेल्या इमारती, अपुरी जागा, त्यातच मोठ्या प्रमाणातील वाहनांची संख्या यामुळे शहर परिसरात वाहतूक कोंडी होत आहे.

प्रकारामुळे या समस्येवर तोडग्यासाठी पालिकेच्या शहर भागाची पाहणी करण्यात आली.

बेशिस्तपणावर ‘पे पार्किंग’चा तोडगा!

फोंडा शहर परिसरातील बेशिस्त पार्किंगची समस्‍या दूर करण्यासाठी पालिकेने ‘पे पार्किंग’ची योजना पुढे केली आहे. सकाळी वाहने जागा मिळेल तेथे पार्क केली जातात. बेशिस्त पार्किंग रोखण्यासाठी पे पार्किंगला चालना दिल्याचे नगराध्यक्ष रितेश नाईक यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ISL 2026: 'एफसी गोवा'चा धडाका, दोन गोलने विजय; मुंबई सिटीची अपराजित दौड खंडित

Horoscope: मेहनतीला मिळणार यशाची सुवर्ण जोड! 'गजकेसरी' योगामुळे 5 राशींच्या आयुष्यात येणार सुखाचे दिवस, संपत्तीत होणार अपार वाढ

GCA Premier League: 'धेंपो' गोव्यातील 'चॅम्पियन' क्रिकेट क्लब, 'चौगुले'विरुद्धच्या अंतिम लढतीत पहिल्या डावातील आघाडीवर बाजी

VIDEO: LIVE मॅचमध्ये हायव्होल्टेज ड्रामा!निमंत्रण न मिळाल्याने संतापला तरुण, थेट खेळपट्टीवरच ट्रॅक्टर फिरवला; पाहा व्हिडिओ

Margao Muncipal: नगरपालिका उद्यानात 'कॅफेटेरिया'चा प्रस्ताव मंत्री दिगंबर कामत यांनीच दिला! प्रभव नायक यांचा आरोप

SCROLL FOR NEXT