Electricity Bill Dainik Gomantak
गोवा

आता घर बसल्या वीज बिल भरा!

'क्यूआर कोड’ प्रणाली : केंद्रीयमंत्री श्रीपाद नाईक यांच्या हस्ते प्रारंभ

दैनिक गोमन्तक

पणजी: वीज बिल भरण्याची प्रक्रिया सुलभ करण्याच्या दृष्टीने विद्युत खात्याने आज डायनॅमिक क्यूआर कोड सुविधा सुरू केली आहे. त्यामुळे घरबसल्या यूपीआय ॲपद्वारे ग्राहकांना आपले बिल भरता येईल. या प्रणाली अंतर्गत विविध संपर्क केंद्रांवर कोड प्रदर्शित केले जाणार आहेत, अशी माहिती विद्युत खात्याकडून देण्यात आली आहे. तसेच 29 जुलैपासून येणाऱ्या बिलांवर हा क्यूआर कोड असणार असल्याचे खात्याने स्पष्ट केले आहे.

(Now pay electricity bill online in goa)

पंतप्रधान नरेंद्र मोदी नवी दिल्ली येथून दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून ऊर्जा मंत्रालयाच्या ‘उज्ज्वल भारत-उज्ज्वल भविष्य- ऊर्जा @ 2045’ अभियानाच्या समारोप सोहळ्यात सहभागी झाले. याप्रसंगी पंतप्रधानांच्या हस्ते ऊर्जा क्षेत्रासाठी सुधारित वितरण क्षेत्र योजनेचा आरंभ आणि सौर रूफटॉप पोर्टलचे अनावरण करण्यात आले. कार्यक्रमादरम्यान पंतप्रधानांनी लाभार्थ्यांशी संवाद साधला. याच अनुषंगाने गोव्यात झालेल्या कार्यक्रमात केंद्रीयमंत्री श्रीपाद नाईक यांच्या हस्ते गोवा विद्युत विभागाच्या डायनॅमिक क्यूआर कोड प्रणालीचा आरंभ करण्यात आला.

असे भरता येईल बिल

बिल भरण्यासाठी ग्राहकाने प्रथम मोबाईल ॲप डाउनलोड करणे आवश्यक आहे. ॲपवरील क्यूआर कोड स्कॅन करण्यास अनुमती देईल. त्यानंतर, अ‍ॅप वापरकर्त्याला ज्या खाते क्रमांकावर पैसे भरायचे आहे, ती रक्कम आणि गुप्त कोड प्रविष्ट करावा लागेल. ॲपला जोडलेल्या बँक खात्यातील रक्कम आपोआप कापली जाईल. ही सुविधा सुरू करण्यापूर्वी माहिती आणि तंत्रज्ञान खात्याने सर्व प्रमुख बँकांशी यासाठी व्यवस्था केली आहे.

सरकारकडून प्रणाली तयार

पुढील महिन्याभरात ग्राहक क्यूआर कोड वापरून वीज बिल भरू शकतील. यासाठी आवश्यक प्रणाली सरकारकडून तयार करण्यात आली आहे. आज डिजिटल युगात बिल भरण्याची प्रक्रिया आणखी सुलभ करण्याच्या उद्देशाने क्यूआर कोड सुविधा सुरू करण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT