CCTV In Goa  Dainik Gomantak
गोवा

गोवेकरांनो रस्त्यावर कचरा टाकताय सावधान!

आता सोनसडोजवळ पंचायतीकडून बसवण्यात येणार उच्च दर्जाचा सीसीटीव्ही कॅमेरा

दैनिक गोमन्तक

मडगाव: रैया ग्रामपंचायतीने शनिवारी सोनसडो कचराकुंड्याजवळ, असणाऱ्या रैया आणि कुडतरीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला कचरा टाकणाऱ्या दोषींना पकडण्यासाठी जुना सीसीटीव्ही कॅमेरा बदलुन उच्च दर्जाचा कॅमेरा बसवण्यात आला. या नवीन सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या मदतीने उपद्रव करणाऱ्यांना पकडण्याची आशा पंचायतीने व्यक्त केली आहे.

(Now high quality CCTV camera will be installed by Panchayat near Sonsoda)

"रैयाचे पंच मारिओ डिसोझा यांनी सांगितले की, शनिवारी पंचायतीद्वारे नियुक्त करण्यात अलेल्या एजन्सीने जुने सीसीटीव्ही कॅमेरे बदलून उच्च दर्जाचे नवीन कॅमेरे बसवण्यात अले आहेत.

नवीन बसवण्यात आलेला सीसीटीव्ही कॅमेरा (CCTV Camera) प्रायोगिक तत्त्वावर निश्चित करण्यात आला असुन, या बाबतीत पुढील कार्यकारिणीच्या बैठकीत निर्णय घेण्यात येईल," असे ते म्हणाले.

ते पुढे म्हणाले की, पंचायतीने (Panchayat) रायया पंचायत कार्यक्षेत्रातील सोनसडो डंप यार्डजवळ उच्च दर्जाचे कॅमेरे बसवण्याची योजना आखली आहे. जुने कॅमेरे निकृष्ट दर्जाचे असल्याने छायाचित्रे टिपता येत नसल्याचे समोर आल्यानंतर सीसीटीव्ही कॅमेरे बदलण्याचा हा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र अद्यापह रस्त्याच्या कडेला कचरा टाकण्याचे प्रकार सुरूच आहेत.

राया (Raia) आणि कुडतरीकडे (Curtorim) जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला कचरा टाकल्याने या ठिकाणी वर्षानुवर्षे उपद्रव निर्माण झाला आहे. चिकन आणि मेडिकलचा कचराही याठिकाणी रस्त्याच्या कडेला टाकण्यात आला होता. दरम्यान हे पंचायतीच्या निदर्शनास आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT