Goa Eco Sensitive Zone Dainik Gomantak
गोवा

Goa Eco Sensitive Zone: गोव्यातील जैवसंवेदनशील गावांची अधिसूचना स्वतंत्रपणे जाहीर होणार? वरिष्ठ अधिकाऱ्याकडून स्पष्ट

Eco-Sensitive Area: राज्यातील जैव संवेदनशील गावांची अधिसूचना केंद्र सरकारचे वन, पर्यावरण व हवामान बदल मंत्रालय स्वतंत्रपणे जारी करू शकते.

गोमन्तक डिजिटल टीम

Goa News: राज्यातील जैव संवेदनशील गावांची अधिसूचना केंद्र सरकारचे वन, पर्यावरण व हवामान बदल मंत्रालय स्वतंत्रपणे जारी करू शकते. यापूर्वी पाच वेळा गुजरात, महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक आणि तमीळनाडू या राज्यांसाठी एकच मसुदा अधिसूचना जारी करण्यात आली होती. आता अंतिम अधिसूचना राज्यवार जारी केली जाऊ शकते, तशी तरतूद करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्याने दिली.

राज्यातील १०८ गावांचा समावेश जैव संवेदनशील विभागात करणारी मसुदा अधिसूचना जारी करण्यात आली आहे. त्यातून २१ गावे वगळावीत यासाठी पर्यावरणमंत्री आलेक्स सिक्वेरा यांनी दिल्लीत प्रस्ताव सादर केला आहे.

मागणी मान्य होऊ शकते!

डॉ. के. कस्तुरीरंगन समितीने जैव संवेदनशील विभागासाठी ठरवलेल्या निकषात न बसणारीच २१ गावे वगळावीत, ही मागणी केल्याने ती मान्य होण्यासारखी आहे. दिल्लीतील बैठकीनंतर कोणतीही प्रतिकूल प्रतिक्रीया आलेली नाही. याचा अर्थ ती मागणी मान्य होऊ शकते आणि त्या आधारे अंतिम अधिसूचना जारी होऊ शकते, असे या अधिकाऱ्याचे म्हणणे आहे.राज्यातील ८७ गाव म्हणजेच १ हजार २४७ चौरस किलोमीटरचा टापू जैव संवेदनशील ठरू शकतो. मागणी मान्य झाल्यास २१ गावे म्हणजे २२६ चौरस किलोमीटरचा टापू या क्षेत्रातून बाहेर राहू शकतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lavani Marathi Folk Art: शेतातील 'लावण' की सौंदर्याचे 'लावण्य'? मराठी मातीशी जोडलेल्या लावणीची वास्तववादी व्याख्या

Hannah Arendt On Violence: दुष्टता ही राक्षसाकडून नाही तर स्वतंत्र विचार न करणाऱ्या सामान्य माणसाकडून घडते! हॅना आरेन्ट यांचे पथदर्शी विचार

Crime News: "तू तिच्याशी का बोलतोस?" बिअर पार्टीतून सुरू झाला वाद; संतापलेल्या तरुणाने ब्लेडने सपासप वार करत मित्राला संपवलं

Verna: टेम्पोवर कोसळली वीजवाहिनी; छत्तीसगडच्या 30 वर्षीय क्लिनरचा मृत्यू

Shani Vakri 2026: शनिदेवांची उलटी चाल! 'या' राशींना बसणार मोठा आर्थिक फटका; नोकरी-व्यवसायात वाढणार मानसिक ताण

SCROLL FOR NEXT