Housing department action Dainik Gomantak
गोवा

'त्या' 900 फ्लॅटधारकांना नोटिसा जारी, 'सेलडीड' न केल्याबद्दल सहकार खात्याअंतर्गत केली कार्यवाही

Housing department action: ‘माझा फ्लॅट’ योजना सुरू करण्यापूर्वी राज्य सरकारने सहकार खात्याअंतर्गत येणाऱ्या सुमारे ९०० सोसायट्यांतील फ्लॅट मालकांना ‘सेलडीड’ न केल्याबद्दल नोटिसा जारी केल्या आहेत.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: ‘माझा फ्लॅट’ योजना सुरू करण्यापूर्वी राज्य सरकारने सहकार खात्याअंतर्गत येणाऱ्या सुमारे ९०० सोसायट्यांतील फ्लॅट मालकांना ‘सेलडीड’ न केल्याबद्दल नोटिसा जारी केल्या आहेत.

ज्यांना आता ‘सेलडीड’ करून फ्लॅट स्वत:च्या नावावर करून घ्यायचा आहे, त्यांनी तो आताच करून घ्यावा किंवा सरकारच्या ‘माझा फ्लॅट’ योजनेचा लाभ घ्यावा, अशा सूचनाही त्यांना देण्यात आल्या आहेत. दरम्यान, याबाबत अध्यादेश जारी करण्यात येणार असून, त्यासंदर्भातील कार्यवाही सुरू आहे.

याबाबत ‘गोमन्तक’शी बोलताना सहकार निबंधक आशुतोष आपटे म्हणाले, ‘‘सहकार खात्याकडे नोंदणी असलेल्या सुमारे ९०० सोसायट्यांतील अनेक फ्लॅट मालकांनी फ्लॅट खरेदी करताना ‘सेलडीड’ केलेले नव्हते. त्यामुळे संबंधित फ्लॅट त्यांच्या नावावर झालेले नव्हते.

त्यांच्याकडे केवळ प्रतिज्ञापत्रे आहेत. त्यामुळेच ज्यांनी ‘सेलडीड’ केलेली नाही, त्यांना नोटिसा जारी करून त्वरित ‘सेलडीड’ करून घेण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. या सूचनांचा गांभिर्याने विचार करावा. शिवाय जे ‘सेलडीड’ करणार नाहीत, त्यांनी ‘माझा फ्लॅट’ योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांना करण्यात आले आहे, असेही आपटे यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lucky Zodiac Signs 2026: व्यापाऱ्यांसाठी जॅकपॉट अन् नोकरदारांना पगारवाढ! ऑगस्ट महिन्यात 'या' राशीची चांदीच चांदी; पैशांची चिंता कायमची मिटणार

Government Jobs: कर्मचारी भरती आयोगाकडून 3 हजार नोकऱ्या; आता आणखी 2 हजार पदांसाठी सरकार सज्ज, CM प्रमोद सावंतांची मोठी घोषणा

Bori Road Safety Issue: बोरीतील धोकादायक साकवाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष? कठडा तुटल्याने वाहनचालकांच्या जीवाला धोका, तातडीने दुरुस्तीची गरज

Garuda Lenka: राजासाठी जीव देण्याची शपथ, मृत्यूची बातमी मिळताच आत्मबलिदान; होयसळ साम्राज्याच्या ‘गरुड लेंका’ योद्ध्यांची रोमांचकारी गाथा

Viral News: आश्चर्य..! दोन तोंड अन् आठ पायांच्या वासराचा जन्म; तब्बल 5 तास चालली प्रसूतीची शस्त्रक्रिया Watch Video

SCROLL FOR NEXT