Goa Bench Of Bombay High Court Dainik Gomantak
गोवा

गोवा खंडपीठाच्या सहा पंचायतींना नोटिसा...

एमआरएफ सुविधा न उभारणे महागात

दैनिक गोमन्तक

पणजी: राज्यातील कचरा विल्हेवाटीसंदर्भात एमआरएफ (मटेरियल रिकव्हरी फॅसिलिटी) सुविधा गोवा खंडपीठाने गंभीर दखल घेतली आहे. याविषयी सहा पंचायतींच्या सरपंच व सचिवांना नोटिसा बजावल्या आहेत. त्यांच्याविरुद्ध अवमान कायद्याखाली कारवाई केली जाऊ नये यासंदर्भात स्पष्टीकरण मागवून त्यावरील सुनावणी येत्या 4 मे रोजी खंडपीठाने ठेवली आहे.

असोल्डा, शेल्डे, मोरपिर्ल, नाकेरी-बेतुल, चिंचिणी व सेरावली या सहा पंचायतींनी नोटीस बजावण्यात आली. पंचायतींनाही निर्देश देऊन कचरा विल्हेवाटीसाठी ठोस पावले उचलण्याचे निर्देश दिले आहेत तरी त्याला सुनावणीवेळी जागा उपलब्ध नसल्याचे किंवा लोकांकडून एमआरएफ सुविधेसाठी जागा निश्‍चित केल्यावर विरोध आहे असे सांगण्यात येत आहे. पंचायती या एमआरएफ सुविधांबाबत गंभीर नसल्याचे आतापर्यंत त्यांनी केलेल्या प्रयत्नावरून दिसून येत आहे अशी बाजू याचिकादारांनी मांडली होती.

पंचायत खात्यालाही एमआरएफ सुविधा उभारण्यासाठी पंचायतींना आवश्‍यक असलेली मदत देण्याच्या सूचना वेळोवेळी करण्यात आल्या होत्या. पंचायतींच्या अनेक भागात कचऱ्याचे ढीग दिसून येत आहेत व त्याबाबत पंचायती गंभीर नाहीत. त्यामुळे या सहा पंचायतींना खात्याच्या संचालकांनी नोटिसा बजावून ते कामात तत्पर नसल्याने पंचायतीच ताब्यात का घेण्यात येऊ नये अशी विचारणा करण्याचे निर्देश दिले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT