Goa Kala Academy Notice Canva
गोवा

Kala Academy: ‘कला अकादमी’ला अस्वच्छतेबद्दल आरोग्य विभागाकडून नोटीस

Goa Public Health Department: तपासणीनंतर कला अकादमीला सात दिवसांच्या आत भंगार काढून परिसर स्वच्छ करण्याचे निर्देश दिले आहेत

गोमन्तक डिजिटल टीम

कला अकादमीचा परिसर डासांचे उत्पत्तीस्थान बनला आहे. कला अकादमीच्या शेजारी विखुरलेल्या भंगार साहित्याची आरोग्य सेवा अधिकाऱ्यांनी तपासणी केली. तपासणीनंतर कला अकादमीला कारणे दाखवा नोटीस बजावून हे भंगार ताबडतोब हटविण्याची ताकीद दिल्याची माहिती आरोग्यसेवा विभागाच्या उपसंचालक डॉ कल्पना महात्मे यांनी दिली.

डॉ. कल्पना महात्मे म्हणाल्या की, आरोग्य सेवा कर्मचाऱ्यांनी कला अकादमी येथे जागेची पाहणी केली. ज्यामध्ये पार्किंगची जागा भंगार साहित्य टाकून अडवण्यात आली होती. आणि ते आता डासांचे उत्पत्तीस्थान बनले आहे. ज्यामुळे डेंग्यू मलेरियाचा प्रादुर्भाव होऊ शकतो.

तपासणीनंतर कला अकादमीला दोन वेळा कारणे दाखवा नोटीस बजावून सात दिवसांच्या आत भंगार काढून परिसर स्वच्छ करण्याचे निर्देश दिले आहेत. कला अकादमीने या सूचनेचे पालन न केल्यास अकादमीचे वीज व पाणी जोडणी तोडण्यासाठी पीडब्ल्यूडी आणि विद्युत विभागाला पत्रव्यवहार केला जाईल, असेही त्यांनी सांगितले.

जून महिन्यात ६० डेंग्यूचे रुग्ण

राज्यात जून महिन्यात एकूण ६० डेंग्यू रुग्ण आढळून आले आहेत. म्हापसामध्ये १७, साळगाव ८, साखळी ७, पर्वरी ५, कोलवाळ ४, कांदोळी ३, पीएचसी खोर्ली २ आणि कुठ्ठाळी २, पेडणे, हळदोण, डिचोली, शिवोली, मये, चिंबल, मडगाव, वास्को, फोंडा, शिरोडा, कासावली या ठिकाणी  प्रत्येकी १ असे डेंग्यूचे रुग्ण आढळले होते. जानेवारी ते जून २०२४ या कालावधीत आरोग्य विभागाकडे डेंग्यूचे एकूण १७७ रुग्णांची नोंद आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Road Repair: '15 दिवसांत रस्‍त्‍यावर एकही खड्डा दिसणार नाही', मंत्री कामत यांचे आश्वासन; कंत्राटदारांना निर्देश दिल्याचे स्पष्टीकरण

Goa Politics: खरी कुजबुज; युती कुणाला नको?

Goa Politics: 'त्यांना जर जवळ केले तर लोक काय म्हणतील'? फुटिरांच्या विरोधात LOP आलेमाव यांचा सवाल; इजिदोरच्या फॉरवर्ड प्रवेशावर नाराजी

Bicholim Accident: 3 दुचाकी एकमेकांवर आदळल्या, डिचोली-साखळी रस्त्यावर विचित्र अपघात; एकजण जखमी Video

Goa Politics: काँग्रेसमध्‍ये सामसूम, फॉरवर्ड - आरजी - आपचा प्रचार सुरू; युतीबाबत विरोधकांत अजूनही ‘तू–तू, मै–मै’

SCROLL FOR NEXT