MLA Antonio Vas Dainik Gomantak
गोवा

Cortalim: प्रत्येकाला सरकारी नोकरी देणे शक्य नाही, व्यवसाय सुरू करा ; अंतोनियो वाझ

खादी महामंडळाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन स्वयंरोजगार सुरू करून आत्मनिर्भर व्हा, असे आवाहन कुठ्ठाळीचे आमदार व खादी ग्रामोद्योग महामंडळाचे अध्यक्ष अंतोनियो वाझ यांनी केले.

गोमन्तक डिजिटल टीम

"प्रत्येकाला सरकारी नोकरी देणे शक्य नाही. त्यामुळे युवकांनी स्वतःचा व्यवसाय सुरू करावा. त्यासाठी त्यांना खादी महामंडळातर्फे विविध योजनांमार्फत अनुदान दिले जात आहे." असे कुठ्ठाळीचे आमदार व खादी ग्रामोद्योग महामंडळाचे अध्यक्ष अंतोनियो वाझ (MLA Antonio Vas) म्हणाले.

खादी महामंडळातर्फे कुठ्ठाळी मतदारसंघातील नागरिकांमध्ये खादी महामंडळाच्या विविध योजनासंबंधी जागृती निर्माण करण्यासाठी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

खादी महामंडळाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन स्वयंरोजगार सुरू करून आत्मनिर्भर व्हा, असे आवाहन कुठ्ठाळीचे आमदार व खादी ग्रामोद्योग महामंडळाचे अध्यक्ष अंतोनियो वाझ यांनी केले.

याप्रसंगी कुठ्ठाळीच्या सरपंच सेनिया परेरा, खादी महामंडळाचे सदस्य रोकोझिन डिसोझा, एस. मोरजकर, एल. व्ही. पानवेलकर, विजयानंद नाईक, राज नाईक, जिल्हा पंचायत सदस्य मर्सिलिना वाझ, केळशीचे सरपंच एपेक्स फिगरेदो व इतर मान्यवर उपस्थित होते.

दरम्यान, वाझ यांनी हा कार्यक्रम आयोजित करण्यामागील हेतू स्पष्ट केला. "खादी महामंडळाच्या खूप योजना आहेत. त्यासंबंधी कोणालाही कोणती माहिती हवी असल्यास त्यांनी महामंडळाच्या अधिकारी वर्ग किंवा आपल्या कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन त्यांनी केले. मोरजकर यांनी खादी ग्रामोद्योग महामंडळाच्या विविध योजनांची माहिती दिली. या योजनांतर्गत अनुदान मिळवून तुम्ही स्वतःचा व्यवसाय सुरू करून आत्मनिर्भर होऊ शकता." असे त्यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Crime News: माहेरी गेलेली बायको परत आली नाही, नैराश्यातून तीन पोरींचा जीव घेऊन स्वतःला संपवलं; सुधाकरनं ओलांडली 'क्रूरतेची सीमा'

PM Kisan Nidhi 23rd Installment: पीएम किसानचा 2,000 रुपयांचा हप्ता उद्या खात्यात! यादीत नाव नसल्यास पैसे अडकू शकतात, आत्ताच अशी करा पडताळणी

Goa Development: गोव्यासाठी दिल्लीतून सुटला तब्बल 2000 कोटींचा निधी! केंद्र आणि राज्य सरकार मिळून गोव्याचा चेहरामोहरा बदलणार; कामतांचा विश्वास

Goa Tourism: 'पर्यटनात विविधता, कुशल मनुष्यबळ निर्मितीवर सरकारचा भर', राज्यात 5 नवीन महाविद्यालयांची मुख्यमंत्र्यांकडून घोषणा

Goa Water Crisis: "गोव्यातील पाणीटंचाईला सावंत सरकारच जबाबदार", युरी आलेमाव यांचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT