DGP Jaspal Singh  Dainik Gomantak
गोवा

DGP Jaspal Singh: केवळ PRO नव्हे, तर वरिष्ठ पोलिस अधिकारी माध्यमांना माहिती देऊ शकतात, कुणालाही अडवलेले नाही!

पोलिसांच्या 'त्या' आदेशावर डीजीपींचे स्पष्टीकरण

गोमंतक ऑनलाईन टीम

Goa Police: केवळ जनसंपर्क अधिकारीच नव्हे तर पोलिस अधीक्षक आणि वरिष्ठ पोलिस अधिकारीही गुन्हयांबाबतची माहिती प्रसारमाध्यमांना देऊ शकतात. कुणालाही अडवलेले नाही, असे स्पष्टीकरण, पोलिस महासंचालक जसपाल सिंग यांनी दिले आहे.

गुन्ह्यांबाबतची माहिती प्रसारमाध्यमांना देण्यास पोलिसांकडून टाळाटाळ केली जात असल्याचा अनुभव पत्रकाराना येत होता. त्यावर पोलिस मुख्यालयातूनच तसा आदेश काढला गेल्याची चर्चा सुरू झाली होती.

हे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन असल्याचे काही पत्रकारांनी निदर्शनास आणून दिले होते.

संबंधित पत्रकात केवळ जनसंपर्क अधिकारीच माहिती देतील, असे बजावण्यात आले होते. केवळ पोलिसांच्या यशाच्याच बातम्या पोलिसांकडून दिल्या जात होत्या. तथापि, बलात्काराच्या गुन्ह्यातील माहिती देण्यास टाळाटाळ केली जात होती.

पोलिसांच्या या कृतीचा काँग्रेसतर्फे निषेधही करण्यात आला होता.

दरम्यान, पोलिस महासंचालक जसपाल सिंग यांनी म्हटले आहे की, पीआरओ नियुक्त केला म्हणजे त्यांनीच सर्व माहिती द्यावी, असे नाही. पोलिस अधीक्षक, वरिष्ठ पोलिस अधिकारी प्रसारमाध्यमांना माहिती देऊ शकतात.

कुणालाही माहिती देण्यास मज्जाव केलेला नाही. पीआरओ नियुक्ती पत्रकारांच्याच आग्रहावरून केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

43.20 कोटींच्या कोकेन प्रकरणात आरोपीला सशर्त जामीन मंजूर; दक्षिण गोवा जिल्हा सत्र न्यायालयाचा मंगेश वाडेकरला दिलासा

Goa Crime: 17 वर्षीय मुलीला पळवून नेऊन केला लैंगिक अत्याचार, डिचोलीतील घटनेनं खळबळ; कणकवलीच्या तरुणाला अटक

Makharotsav: ..उत्सवमूर्ती जिवंत झाल्याचा आभास देणारा 'मखरोत्सव', गोव्यातील लोकसंस्कृतीचे दर्शन

Viral Video: 'खतरों के खिलाडी' वाली स्टंटबाजी, पठ्ठ्याचा सोशल मीडियावर व्हिडिओ तूफान व्हायरल; नेटकरी म्हणाले...

मनोज परबांच्या कार्यकर्त्यावर मंत्री नीलकंठ हळर्णकर धावून गेले; कोलवाळमध्ये आरजी आणि भाजप समर्थक आमने-सामने Watch Video

SCROLL FOR NEXT