गोवा

Goa: उत्तर, दक्षिण जिल्हा रूग्णालय होणार डिजिटल, रूग्णांचे होणार डिजिटल रेकॉर्डर्स

आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत तयार केली जाणार क्लाऊड बेस सिस्टिम

गोमन्तक डिजिटल टीम

गोव्यातील उत्तर आणि दक्षिण गोवा जिल्हा रूग्णालयात (North, South District Hospital) आयुष्यमान भारत डिजिटल मिशन (Ayushman Bharat Digital Mission) (ABDM) अंतर्गत आरोग्य व्यवस्थापन माहिती प्रणालीचा (Health Management Information System) (HMIS) अवलंब केला जाणार आहे. त्यानुसार क्लाऊस बेस सिस्टिम (Cloud Base System) निर्माण करून त्याद्वारे रूग्ण आणि रूग्णालयांची माहिती जतन केली जाईल. आरोग्यमंत्री विश्वजित राणे (Vishwajit Rane) म्हणाले, आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत प्रत्येक रूग्णाला ABHA आरोग्य ओळखपत्र दिले जाईल. (North, South District Hospitals to be digitized with HMIS Under Ayushman Bharat Digital Mission)

विश्वजीत राणे म्हणाले, आयुष्यमान भारत डिजिटल मिशन ही देशाअंतर्गत मजबूत वैद्यकिय सुविधा आणि माहिती प्रणाली निर्माण करण्याच्या दृष्टिने महत्वाचे पाऊल आहे. डिजिटल हेल्थ कार्ड प्रत्येक रूग्णाला दिले जाणार आहे, या हे रूग्णाचे ओळखपत्र असून त्याचा वैद्यकिय रेकॉर्ड त्यात जतन होईल. त्यामुळे देशातील वैद्यकिय साधन सुविधा यांच्यामधील दरी दूर व्हायला मदत होईल.

आयुष्यमान भारत डिजिटल मिशन अंतर्गत नागरिकांना देशात उपलब्ध वैद्यकिय सुविधांचा देखील लाभ घेता येईल. सुरूवातीला गोव्यातील उत्तर आणि दक्षिण जिल्हा रूग्णालयात डिजिटल प्रणालीचा अवलंब सुरू होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी देशभरात २७ सप्टेंबर २०२१ रोजी आयुष्यमान भारत डिजिटल मिशन योजना जाहीर केलीय.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bison In Sawantwadi: एक, दोन नव्हे… थेट 15 गवारेड्यांचा धुमाकूळ! लोकांना फुटला घाम, पाहा थरकाप उडवणारा VIDEO

तुम्हालाही विनाकारण राग येतोय? सावधान! असू शकते रक्तातील साखरेच्या बदलांचे लक्षण, 'या' गोष्टी ठेवा लक्षात

Shravan Recipes in Goa: कणगाची खीर, नागपंचमीला पातोळ्या; श्रावणातील गोव्याची समृद्धता

Shubman Gill Record: शुभमन गिल बनणार नवा 'लिजेंड', डॉन ब्रॅडमनचा 88 वर्ष जुना विक्रम मोडणार; फक्त 'इतक्या' धावांची गरज

Goa Fishing: खरा गोंयकार ‘बाप्पा मोरया’ केल्याबरोबर मासळीच्या स्वादाचा आनंद तेवढ्याच खुषीने घेतो..

SCROLL FOR NEXT