Mapusa District Hospital  Dainik Gomantak
गोवा

Goa Patient toll Increased : म्हापसा हॉस्पिटलमध्ये रुग्णसंख्येत 40 टक्क्यांनी वाढ

लहरी वातावरणामुळे आजारांची साथ; लक्षणे दिसताच उपचार घेण्याचं आवाहन

दैनिक गोमन्तक

म्हापसा : सध्या राज्यात जोरदार पाऊस पडत आहे. असे असले तरी मध्येच ऊनही पडते. त्यामुळे वातावरणात सतत बदल होत आहे. प्रत्येक व्यक्तीच्या शरीराला या वातावरणाशी जुळवून घेणे सहज शक्य होत नाही. त्यामुळे म्हापसा येथील उत्तर गोवा जिल्हा इस्पितळातील बाह्य विभागात उपचारासाठी येणाऱ्या रुग्ण संख्येत सुमारे 40 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

मागील आठवड्याभरात इस्पितळात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णसंख्येत 40 टक्क्यांनी वाढ झाली आहे. सामान्य दिवसांत रुग्णांचा हा आकडा 500 पर्यंत असायचा. सध्या हा आकडा ७०० पेक्षा जास्त झाल्याचे या इस्पितळाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. वंदना धुमे यांनी सांगितले.

वातावरणातील सतत होणारे बदल हे रुग्णसंख्या वाढीस कारण ठरल्याचे डॉ. धुमे यांनी सांगितले. ताप, सर्दी, खोकला, गॅस्ट्रो यासारख्या तक्रारींचा यामध्ये समावेश असून, हे रुग्ण सर्व वयोगटातील असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या इस्पितळात आयसीयू तसेच सीसीयू विभागाच्या स्थापनेसाठी प्रशासनाकडून पावले उचलली आहेत. अतिरिक्त डॉक्टर तसेच तज्ज्ञांची सोय करायला हवी.

पोट दुखणे, जुलाब व उलट्या होणे, ताप येणे, भूक न लागणे, डोकेदुखी, अशक्तपणा यासारखे आजार बळावताहेत. काहींचे त्रास अधिक वाढल्याने संबंधितांना निर्जलीकरणाचा त्रासही होऊ लागला आहे. साथीच्या रोगाची लागण होऊ नये यासाठी पाणी उकळून व गाळून प्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

...तर गोमेकॉवरील ताण होणार कमी

या इस्पितळात आयसीयू तसेच सीसीयू विभागाच्या स्थापनेसाठी प्रयत्न सुरू आहेत. शिवाय त्यासाठी लागणारे डॉक्टर तसेच तज्ज्ञांची सोय करावी. ही व्यवस्था झाल्यास गोमेकॉवरील अतिरिक्त ताण कमी होण्यास मदत होईल.

आता डिजिटल हेल्थ आयडी कार्ड

केंद्र सरकारच्या ‘आयुष्मान भारत डिजिटल मिशन’अंतर्गत जिल्हा इस्पितळात येणाऱ्या रुग्णांची ऑनलाईन नोंदणी सुरू आहे. 15 दिवसांपूर्वी सुरु केलेल्या या योजनेंतर्गत रुग्णांना डिजिटल हेल्थ आयडी कार्ड दिले जाईल. हे डिजिटल कार्ड असेल. त्यात रुग्णांच्या आरोग्यासंबंधीची माहिती डिजिटल पद्धतीने नोंदवली जाईल. प्रत्येक रुग्णासाठी स्वतंत्र आयडी असेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lawrence Bishnoi: मोठी बातमी! कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई टोळीतील सात जणांना गोवा पोलिसांनी घेतले ताब्यात

Kerala Cricket League: 10 चौकार, 18 षटकार! संजू सॅमसनलाही सोडले मागे, केरळ क्रिकेट लीगमध्ये विष्णू विनोदचे 'तूफान'

Ganesh Chaturthi: 'या' वेळेत करा गणरायाची प्रतिष्ठापना! सुख, समृद्धी, ऐश्वर्याने भरेल घर; जाणून घ्या कारण

Viral Video: डोक्यावर पट्टी अन् तुटलेला हात घेऊन फलंदाजी... क्रिकेट वेड्या तरुणाचा व्हिडिओ व्हायरल; तुम्ही पाहिलाय का?

Bajrang Dal Goa: 'ईद दिवशी जुलूसला परवानगी नको, कायदा-सुव्यवस्था बिघडल्यास आम्ही जबाबदार नाही'! बजरंग दलाचा इशारा

SCROLL FOR NEXT