Holi 2024: Dainik Gomantak
गोवा

Holi 2024: उत्तर गोवा उमेदवार श्रीपाद नाईक यांनी लुटला रंगपंचमीचा आनंद

Holi 2024: निवडणूक माहोलचा परिणाम: उमेदवारांची पावले आझाद मैदानाकडे...

दैनिक गोमन्तक

Holi 2024:

लोकसभा निवडणुकीचा माहोल तयार झाला आहे. काँग्रेसचे उमेदवार अद्याप जाहीर व्हायचे बाकी आहे. भाजपने दोन्ही जागांवरील उमेदवार जाहीर करून प्रचाराचा नारळ फोडण्याची तयारी सुरू केली आहे.

निवडणुकीचे वातावरण असल्याने लोकसंपर्क साधता येईल, अशा आझाद मैदानावरील रंगपंचमीच्या कार्यक्रमाची वेळ श्रीपाद नाईक (भाऊ) यांनी हेरली आणि उपस्थित राहून रंगपंचमी खेळत लोकांच्या भेटीच्या मागून आपला अजेंडाही पुढे नेल्याचे स्पष्ट दिसून आले.

प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांच्याबरोबर श्रीपाद नाईक यांनी आझाद मैदानावर पाऊल ठेवले. एकावेळी हजारो लोकांच्या गाठीभेटी करण्याची संधी रंगपंचमीच्या कार्यक्रमानिमित्त भाऊंनी साधली.

होळीच्या निमित्ताने रंगपंचमी खेळण्यासाठी भाऊ येण्याची ही घटना अनेकांना ‘निवडणूक फॅक्टर’ असल्याचे तत्काळ जाणवलेही. उपस्थितांपैकी ज्यांना ज्यांना ते भेटले, त्यांच्यापैकी काहींनी भाऊंनी संधी साधली, असे म्हणत होते.

रंगपंचमीच्या निमित्ताने पणजी शिमगोत्सव समिती नागरिकांना महालक्ष्मी मंदिरात बोलावते, परंतु यावेळी समितीने थेट आझाद मैदानावर येण्याचे आवाहन केल्याने या भेटीमागील हे कारण तर नसावे ना, असा प्रश्‍न उपस्थित होतो. मनोहर पर्रीकरांच्या काळात पर्रीकर हे स्वतः या कार्यक्रमात सहभागी होत असत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Weather Update: राज्यात पावसाचा जोर ओसरणार? कमी दाबाच्या पट्ट्यामुळे झालेल्या पावसानंतर पुढील 4 दिवस तुरळक सरींचा अंदाज, शेतकऱ्यांची चिंता कायम

VIDEO: भाजपवर सरदेसाईंचा जोरदार हल्लाबोल; 'वोट चोरी'चा आरोप करत म्हणाले, विधानसभा निवडणूक हलक्यात घेता येणार नाही

8th Pay Commission: 45,000 किमान पेन्शन मिळणार? 8व्या वेतन आयोगासमोर पेन्शनर्सनी मांडल्या ‘या’ मागण्या

West Zone Athletics: पश्चिम विभागीय ॲथलेटिक्ससाठी गोवा सज्ज, यजमानांचा 124 सदस्यीय संघ; स्पर्धा रविवारपासून अटल स्टेडियमवर

Vasco: एकाच मार्गावर वेगवेगळी वेगमर्यादा, वास्कोतील वाहनचालक चक्रावले; दोन सरकारी खात्यांत समन्वयाचा अभाव

SCROLL FOR NEXT