High Court of Bombay at Goa Dainik Gomantak
गोवा

Anjuna Noise Pollution: हणजूणात रात्री उशिरापर्यंत कर्कश आवाजात संगीत; 21 रेस्टॉरंट्सना हायकोर्टाचा दणका

High Court Hearing On Goa Noise Pollution: हणजूण क्षेत्रात २१ डिसेंबर २०२४ ते १ जानेवारी २०२५ या काळात रात्री उशिरापर्यंत कर्कश आवाजाने व वेळेचे बंधन न ठेवता ५२ आस्थापने सुरू होती.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: हणजूण क्षेत्रात २१ डिसेंबर २०२४ ते १ जानेवारी २०२५ या काळात रात्री उशिरापर्यंत कर्कश आवाजाने व वेळेचे बंधन न ठेवता ५२ आस्थापने सुरू होती, त्यापैकी सुमारे २१ जणांनी पूर्ण उल्लंघन केले आहे. त्यामुळे यासंदर्भातची माहिती गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ तसेच हणजूण पोलिसांनी केलेल्या कारवाईची माहिती सादर करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने द्यावेत यासंदर्भातचा अर्ज याचिकादार डेस्मंड आल्वारिस यांनी बुधवारी अवमान याचिकेत सादर केला. त्यामुळे यावरील सुनावणी येत्या २७ जानेवारीला ठेवण्यात आली आहे.

हणजूण येथे नाताळ काळात २१ डिसेंबर २०२४ ते १ जानेवारी २०२५ पर्यंत उल्लंघन केलेल्या काही हॉटेल्स, पब्स व रेस्टॉरंट्सची (Restaurants) २१ नावे याचिकादाराने खंडपीठासमोर सादर केली आहे. हणजूण पोलिस स्थानकाला १६ डिसेंबर २०२४ ते ५ जानेवारी २०२५ या काळात फोन करून नोंदवलेल्या तक्रारींची माहिती सादर केली. यापैकी काही ५ ते ६ आस्थापनांविरुद्ध हणजूण पोलिसांनी कारवाई केली आहे.

अहवाल सादर करा

आस्थापनांच्या सीसी टीव्ही कॅमेराची फूटेजीस मागवून घेऊन रात्री १० वाजल्यानंतर कोणी उल्लंघन केले आहे व त्याविरुद्ध काय कारवाई केली, याची माहिती देण्याचे निर्देश द्यावेत. पंचायतीने पाठवलेल्या पत्रासंदर्भात संबंधित यंत्रणांना अहवाल सादर करण्यास लावावे, अशी विनंती या अर्जात याचिकादाराने केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Colvale Jail: ड्रग्ज, दरोड्यांचे कट अन् कारागृहातील मृत्यू; कोलवाळच्या भिंतीआड दडलंय काय? धक्कादायक वास्तवानं खळबळ

Goa Congress: वरवरची मलमपट्टी नको, मुळावर उपचार हवा! खर्गे आले, एकीचा संदेश दिला; पण काँग्रेसची अंतर्गत गटबाजी संपणार कधी?

Goa Politics: 'भाजपला हरवण्याआधी काँग्रेसने स्वतः एकवटावे', खर्गेंच्या आवाहनावर सरदेसाईंचा पलटवार; पक्षांतराची भीती

Goa Assembly Election 2027:'एकत्र लढू, एकत्र जिंकू'; गोवा विधानसभा निवडणुकीआधी खर्गेंचा काँग्रेस नेत्यांना विजयमंत्र

World Record: 1383 ध्वजांनी रचला इतिहास, न्यू जर्सीत गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड! FIA कडून जागतिक विक्रमाची नोंद

SCROLL FOR NEXT