Olive Ridley Turtles Dainik Gomantak
गोवा

Olive Ridley Turtles: ध्वनिप्रदूषण कासवांना मारक

‘गोमन्तक’च्या वृत्ताची दखल : आश्‍वेत युकिओ बीच रिसॉर्टवर निर्बंध

गोमन्तक डिजिटल टीम

मोरजी, आश्‍वे व मांद्रे समुद्रकिनाऱ्यावरील कासव संवर्धन क्षेत्रात ध्वनी प्रदूषण तसेच चमकणाऱ्या लाईटचा वापर होत असल्याची मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या बातम्यांची गंभीर दखल घेतली आहे.

हजारो वर्षापासून ओलिव्ह रिडले कासव या समुद्रकिनाऱ्यावर फेब्रुवारी व मार्च महिन्यात अंडी घालण्यास येतात त्यावेळी या ध्वनी प्रदूषणाचा व चमकणाऱ्या लाईटमुळे त्याचा परिणाम होत असल्याने खंडपीठाने सरकारी यंत्रणांना त्या ठिकाणी तपासणीचे आदेश दिले आहेत

आश्‍वे येथील युकिओ बीच रिसॉर्टवर निर्बंध घालत पुढील सुनावणीपर्यंत (21 मार्च) आऊटडोअर साऊंडसिस्टीम व चमकणाऱ्या लाईटच्या वापरास बंदी घातली आहे.

दै. ‘गोमन्तक’ वृत्तपत्रातून प्रसिद्ध झालेल्या बातम्यांमध्ये आश्‍वे येथील युकिओ बीच रिसॉर्टमध्ये रात्रीच्यावेळी कर्कश आवाजाने संगीत वाजविले जाते तसेच चमकणाऱ्या लाईटचाही वापर केल्याने ध्वनी प्रदूषणाचे उल्लंघन होत असल्याचे निदर्शनास आणले होते.

खंडपीठाने सांगितले की, या समुद्रकिनाऱ्यावर ओलिव्ह रिडले कासव अंडी घालण्यासाठी येत असतात. मात्र या कर्कश आवाजामुळे त्यांच्यावर परिणाम होत आहे. गेल्या 45 दिवसांत मोरजी व मांद्रे येथे कासव संवर्धनाची समस्या नाही. मात्र आश्‍वे येथे ती उद्‍भवत आहे. हे रिसॉर्ट कासव संवर्धन क्षेत्राच्या जवळच आहे.

दरवर्षी हे कासव या समुद्रकिनाऱ्यांवर अंडी घालण्यास येतात. हे समुद्रकिनारे कासव संवर्धनासाठी नैसर्गिक वारसा ठिकाणे आहेत तो एक चमत्कारच आहे. या ठिकाणांना संरक्षण देणे संबंधित सरकारी यंत्रणेचे काम आहे.

मोठ्या आवाजाने किंवा चमकणाऱ्या लाईटमुळे अंडी घालताना त्यांच्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे युकिओ बीच रिसॉर्टला याचिकेत प्रतिवादी करण्यात यावे व त्याला नोटीस बजावण्यात यावी. ही नोटीस पेडणे पोलिस निरीक्षकांनी रिसॉर्टच्या मालकाला बजावावी.

पेडण्याचे उपजिल्हाधिकारी, पोलिस निरीक्षक, जीसीझेडएमए व वन खात्याच्या अधिकाऱ्यांनी कासव संवर्धन क्षेत्रांना रात्रीच्यावेळी भेटी देऊन तेथे ध्वनी प्रदूषणाचे उल्लंघन व चमकणाऱ्या लाईटचा वापर केला जातो का? याची तपासणी करावी. याबाबत अहवाल सादर करावा. ही कार्यवाही त्वरित करण्यात यावी व दोन आठवड्यात त्याचा अहवाल सादर करावा, असे खंडपीठाच्या आदेशात म्हटले आहे.

खंडपीठ आक्रमक

युकिओ बीच रिसॉर्टमध्ये सुरू असलेल्या पार्ट्यांमधील ध्वनी व चमकणाऱ्या लाईटची तपासणी होऊन अहवाल सादर होत नाही, तोपर्यंत हे रिसॉर्ट आऊटडोअर कार्यक्रमासाठी बंद ठेवण्यात येत आहे. हा बंदीचा आदेश पुढील सुनावणीपर्यंत कायम असेल, असे खंडपीठाच्या आदेशात नमूद केले आहे.

कडक कारवाईची गरज

वागतोर येथील दोन रेस्टॉरंट्समध्ये रात्री 10 वाजल्यानंतरही मोठ्या आवाजाने संगीत वाजवले जात आहे. या दोन्ही रेस्टॉरंट्सची ही जुनी पद्धत आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना होणाऱ्या त्रासामुळे तक्रारी दाखल होऊनही ठोस पावले उचलली जात नाहीत.

हे जर खरे असेल तर अटींचे उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई केली जावी. त्यांना पुन्हा परवानगी देण्यापूर्वी सरकारी यंत्रणेने अटींचे पालन केले जाईल यावर लक्ष ठेवावे. उल्लंघन झाल्यास त्यांचा परवाना रद्द केला जावा. पोलिस अधीक्षक, उपअधीक्षक व निरीक्षकांनी हे उल्लंघन होणार नाही, यासाठी योग्य ती खबरदारी घ्यावी, असे निर्देश देण्यात आले आहेत.

अटींचे पालन व्हावे : सागरदीप शिरसईकर यांनी समुद्रकिनारी भागात ध्वनीप्रदूषणसंदर्भातची जनहित याचिका सादर केली आहे. काही रेस्टॉरंट्स व हॉटेल्सना सरकारी यंत्रणेकडून परवानगी देताना अटी घालून दिल्या जातात, मात्र त्याचे उल्लंघन केले जाते.

त्यामुळे समुद्र किनाऱ्यावर ध्वनीपूरषण मोठ्या प्रमाणात होते. त्याचा फटका कासव संवर्धनाला होतो. जर अटीचे सर्वांनी पालन केले, तर कासव संवर्धनात अडचण येणार नाही. परवानगी देताना दिलेल्या अटीचे पालन होणे गरजेचे आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IFFI Goa 2024: चित्रपट महोत्सवाला तुडुंब गर्दी; मात्र फोंड्याच्या ‘मूव्ही मॅजिकला’ अजूनही प्रेक्षक मिळेना

Saint Francis Xavier School: संत फ्रान्सिस झेवियर विद्यालयाला कारणे दाखवा नोटीस, धबधब्यावर विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घातल्याचा ठपका

Goa Live News Today: माजी सरपंच प्रशांत नाईकांकडून प्राथमिक शाळेला लाकडी बाक प्रदान

Miraai Project Goa: पडून असणाऱ्या स्क्रॅप वाहनांची समस्या संपणार! ‘मिराई’ प्रकल्पाचे मडकईत उद्‍घाटन; आमदार कामत यांची उपस्थिती

UCC and One Nation One Election : UCC, एक देश एक निवडणुकीची देशाला गरज; मुख्यमंत्री सावंत यांचे संविधान दिनी पुन्हा भाष्य

SCROLL FOR NEXT