Nilesh Cabral Dainik Gomantak
गोवा

Nilesh Cabral: कुडचडे, बागा येथे ध्वनी, धूळ प्रदूषण मापक यंत्रणा कार्यान्वित

नीलेश काब्राल : राज्यातील किनारपट्टी भागातही बसविणार यंत्रे

गोमन्तक डिजिटल टीम

Nilesh Cabral राज्यातील किनारपट्टी भागात मोठ्या प्रमाणावर ध्वनी प्रदूषणाच्या तक्रारी येत आहेत. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी लवकरच तेथे ध्वनी प्रदूषण मोजण्याची यंत्रणा बसविण्यात येईल, अशी माहिती पर्यावरणमंत्री नीलेश काब्राल यांनी दिली.

आज कुडचडे, दूधसागर, कोलवासह बागा येथे धूळ व ध्वनी प्रदूषण चाचणी नियंत्रण करणारी यंत्रे बसविण्यात आली आहे. याद्वारे येथे होणारे प्रदूषण लोकांना बघता येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

कुडचडे रवींद्र भवनमध्ये आयोजित ध्वनी आणि धूळ प्रदुषण मापक यंत्रे कार्यान्वित कार्यक्रमाला नगराध्यक्ष जास्मीन ब्रागांझा, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष महेश पाटील, शर्मिला मोंतेरो, नगरसेवक प्रदीप नाईक, जेएसडब्ल्यूचे कॅ. अनुराग भाऊलीवल आदी उपस्थित होते.

खाण भागात धूळ आणि ध्वनी प्रदूषण यंत्रे, तर किनारपट्टीत ध्वनी मापक यंत्रे यंत्रे बसविण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे, असे यावेळी सांगण्यात आले.

सभागृह मालकांनी घ्यावेत दाखले

लग्न समारंभावेळी उपजिल्हाधिकारी व उत्पादन शुल्क विभागाकडून ध्वनी यंत्रणा बसविण्यासाठी, मद्य वापर करण्यासाठी ना हरकत दाखले घ्यावे लागतात. यावर सुद्धा आता सरकार गंभीरपणे विचार करीत आहे.

भविष्यात लग्न समारंभ आयोजित होणारी स्थळे, सभागृह मालकांनीच ना हरकत दाखले पूर्वीच घ्यावेत. जेणेकरून आयोजकांचा वेळ वाचेल. दाखले नसल्यास ध्वनीयंत्रे, मद्याचा वापर करता येणार नाही, असे मंत्री काब्राल म्हणाले.

राज्यात आता खाण व्यवसाय सुरू होणार आहे. त्यावेळी धूळ व ध्वनी प्रदूषण किती होते, ते या यंत्रामुळे अचूक कळणार आहे. त्यामुळे त्यावर उपाययोजना करण्यास मदत होईल.

- नीलेश काब्राल, पर्यावरणमंत्री

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT