Goa Tourism Dainik Gomantak
गोवा

Goa Tourism|पर्यटनसंबंधी व्यवसायांसाठी आता ‘एनओसी’ सक्तीची

पर्यटनाशी संबंधित सर्व व्यवसायांसाठी पर्यटन खात्याकडून ना हरकत दाखला (एनओसी) सक्तीचा करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.

दैनिक गोमन्तक

पणजी: पर्यटनाशी संबंधित सर्व व्यवसायांसाठी पर्यटन खात्याकडून ना हरकत दाखला (एनओसी) सक्तीचा करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. सर्व हॉटेल्स, रेस्टॉरंट्‌स आणि क्लबना हा दाखला घेतल्याशिवाय कार्यरत राहता येणार नाही, असे पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी स्पष्ट केले.

('NOC' is now mandatory for tourism related businesses in goa)

बेकायदेशीरपणे व्यवसाय करणाऱ्या 400 हून अधिक व्यावायिकांना पर्यटन खात्याने नोटसि बजावली होती. त्यांना 30 दिवसांच्या आत नोंदणी करण्याचे निर्देश खात्याकडून देण्यात आले आहेत. तसे न केल्यास कायदेशीर कारवाईचा इशाराही खात्याने दिला आहे. पर्यटन क्षेत्राला सुस्थितीत आणण्यासाठी शासन यंत्रणा कार्यान्वित करण्याचे काम करत आहे.

स्टँड-अलोन रेस्टॉरेंट, कॅफे, वेलनेस सेंटर इत्यादींना आता पर्यटन खात्याकडून कायदेशीर म्हणून संबोधले जाण्यासाठी एनओसी घ्यावी लागेल. कारण ते सर्व पर्यटन उद्योगाचे भाग आहेत, असे खंवटे म्हणाले.

राज्यात पुढच्या महिन्यापासून पर्यटन हंगाम सुरू होणार आहे. यंदा हंगाम सुरळीतपणे पार पाडण्यासाठी गोवा पर्यटन खात्याकडून तयारी केली जात आहे. त्याचा भाग म्हणून ना हरकत दाखल्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे, असे समजते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sal River: साळ नदीप्रश्‍नी काँग्रेस आक्रमक! आमदारांच्या भूमिकेवर जोरदार टीका; कायमस्वरूपी तोडग्याची केली मागणी

Lairai Jatra: श्री लईराई जत्रोत्‍सवाच्‍या तयारीला वेग! आमदारांकडून आढावा; 10 एप्रिलपर्यंत सर्व उपाययोजना पूर्ण करण्याचे निर्देश

'मिस यू डॅडी'...लिहून संपवले जीवन! गोव्याच्या मुलीचा कोल्हापुरात दुर्दैवी अंत; कारण अस्पष्ट

Goa Politics: खरी कुजबुज; दळवीबाबना मिळणार मोठ्ठे ‘गिफ्‍ट’

Goa Tourism Kerala: गोव्याच्या पर्यटनात केरळची ‘एन्ट्री’! टॅक्सी व्यावसायिकांपुढे मोठे आव्हान; विश्रांती पर्यटनाकडे पाऊल

SCROLL FOR NEXT