FIFA World Cup 2026: मेक्सिकोची बाद फेरी निश्चित, गोलरक्षक किम सेऊंगची चूक दक्षिण कोरियाच्या मुळावर

Mexico knockout stage: दक्षिण कोरियाच्या गोलरक्षकाने केलेल्या अक्षम्य चुकीचा अचूक फायदा मेक्सिकोने घेतला आणि १-० अशा विजयासह विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेची आपली पुढची फेरी निश्चित केली.
FIFA World Cup 2026
FIFA World Cup 2026Dainik Gomantak
Published on
Updated on

दक्षिण कोरियाच्या गोलरक्षकाने केलेल्या अक्षम्य चुकीचा अचूक फायदा मेक्सिकोने घेतला आणि १-० अशा विजयासह विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेची आपली पुढची फेरी निश्चित केली.

सहयजमान असलेल्या मेक्सिकोचा हा सलग दुसरा विजय आहे आणि यंदा बाद फेरी गाठणारा त्यांचा पहिला संघ ठरला आहे. २०२२ मध्ये गतवेळेस झालेल्या विश्वकरंडक स्पर्धेत त्यांचे आव्हान गटातच संपुष्टात आले होते. यंदा घरच्या मैदानावर मोठा पाठिंबा मिळत असताना त्यांची कामगिरी बहरत आहे.

या सामन्यात आमच्या अपेक्षेप्रमाणे खेळ झाला नसला तरी आम्ही योग्य दिशेने प्रगती करीत आहोत. दक्षिण कोरियाच्या खेळाडूंनी आम्हाला मुक्तपणे खेळू दिले नाही. तरीही आम्ही त्यांनी केलेल्या एका चुकीमुळे आमच्या नावावर एक गोल झळकला.

- झेव्हियर अग्युली, मेक्सिकोचे प्रशिक्षक

असा झाला गोल...

या सामन्यातला एकमेव गोल मेक्सिकोच्या लुईस रोमो याने ५०व्या मिनिटाला केला. त्याच्या प्रयत्नांना दक्षिण कोरियाचा गोलरक्षक किम सेऊंग ग्यू याचा ढिसाळपणा फायदेशीर ठरला. चेंडू अडवताना किम सेऊंगची त्याच्याच संघातील बचावखेळाडूशी टक्कर झाली आणि चेंडू त्याच्या हातून निसटला. या संधीचा फायदा घेत लुईस रोमोने सहजपणे चेंडू गोलजाळ्यात मारला.

ही चूक मुळावर आली तरी दक्षिण कोरियाला ८७व्या मिनिटाला गोल करून बरोबरी साधण्याची संधी होती. दक्षिण कोरियाच्या चो गुऊ सुंग याने मारलेला हेडर मेक्सिकोचा गोलरक्षक रॉल रांजेल याने अडवला. त्यानंतर आणखी एकदा अचूक गोलरक्षण त्याने केले.

ए गटात समावेश असलेल्या मेक्सिकोचे सलग दोन विजयांनंतर सहा गुण झाले आहेत. दक्षिण कोरियापेक्षा तीन तर चेक प्रजासत्ताकपेक्षा पाच गुणांनी ते पुढे आहेत. त्यामुळे त्यांचा बाद फेरीतील प्रवेश निश्चित झाला. गटातील पहिले दोन संघ अंतिम ३२ संघांच्या फेरीसाठी पात्र ठरणार आहेत. मेक्सिकोचा अखेरचा साखळी सामना चेक प्रजासत्ताक संघाविरुद्ध बुधवारी होणार आहे.

FIFA World Cup 2026
Goa Tourism: देशांतर्गत पर्यटकांचा ओघ कायम, मे महिन्यात 4.53% वाढ; 46.39 लाख पर्यटकांची नोंद

सून ह्युंगकडून निराशा

३३ वर्षीय सून ह्युंग हा दक्षिण कोरियाचा हुकमी खेळाडू; परंतु मेक्सिकोविरुद्धच्या सामन्यात तो प्रभावहीन ठरला. अखेर त्याला ५७व्या मिनिटाला बदलण्यात आला. विश्वकरंडक स्पर्धेत दक्षिण कोरियाकडून सर्वाधिक विश्वकरंडक गोल आणि आशिया खंडातून सर्वाधिक गोल करण्याची संधी त्याला होती. गेल्या तीन विश्वकरंडक स्पर्धेत मिळून त्याला तीनच गोल करता आले आहेत.

दक्षिण कोरियाचा संघ जागतिक फुटबॉल क्रमवारीत २२व्या स्थानावर आहे. सलग अकराव्यांदा आणि एकूण १२ वेळा विश्वकरंडक स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत. आशिया खंडातून सर्वाधिक १२ वेळा विश्वकरंडक स्पर्धा खेळणारा त्यांचा संघ आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com