Goa Tourism: देशांतर्गत पर्यटकांचा ओघ कायम, मे महिन्यात 4.53% वाढ; 46.39 लाख पर्यटकांची नोंद

Goa tourism growth: पर्यटनात घसरण झाल्याच्या चर्चांना छेद देत गोव्याने २०२६च्या पहिल्या पाच महिन्यांत तब्बल ४६.३९ लाख पर्यटक आगमनाची नोंद केली आहे.
Goa Tourism
Goa TourismDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: पर्यटनात घसरण झाल्याच्या चर्चांना छेद देत गोव्याने २०२६च्या पहिल्या पाच महिन्यांत तब्बल ४६.३९ लाख पर्यटक आगमनाची नोंद केली आहे. जानेवारी ते मे २०२६ या कालावधीत राज्यात ४६,३९,१६५ पर्यटक दाखल झाले असून, मागील वर्षीच्या तुलनेत ही वाढ ०.३९ टक्के असल्याची माहिती पर्यटन खात्याने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीतून समोर आली आहे.

मे २०२६ हा महिना विशेषतः उत्साहवर्धक ठरला. या महिन्यात ९,६९,०९० पर्यटकांनी गोव्याला भेट दिली असून, मे २०२५ च्या तुलनेत ही वाढ ४.५३ टक्के आहे. जानेवारी ते मे या कालावधीत राज्यात ४४,३७,०१८ देशांतर्गत पर्यटक तर २,०२,१४७ विदेशी पर्यटक आले.

पर्यटन संचालक केदार नाईक यांनी सांगितले की, पर्यटन विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांमुळे आणि विविध पर्यटन अनुभवांच्या प्रसारामुळे वर्षभर पर्यटक आकर्षित होत आहेत. पर्यटकांचा अनुभव अधिक समृद्ध करण्याबरोबरच शाश्वत पर्यटन विकासावर भर देण्यात येत आहे.

Goa Tourism
Goa Politics: उमेदवारीचे निकष, रणनीतीही ठरणार; भाजप राज्य कार्यकारिणीची आज बैठक

एकूणच, २०२६च्या पहिल्या पाच महिन्यांतील कामगिरीमुळे गोव्याचा पर्यटन उद्योग वर्षाच्या उत्तरार्धातही सकारात्मक गतीने पुढे जाण्याची चिन्हे दिसत आहेत. राज्य सरकार सर्वसमावेशक, शाश्वत व दीर्घकालीन पर्यटन विकासावर भर देत असल्याचा दावा पर्यटन विभागाने केला आहे.

Goa Tourism
Goa Development: गोव्यासाठी दिल्लीतून सुटला तब्बल 2000 कोटींचा निधी! केंद्र आणि राज्य सरकार मिळून गोव्याचा चेहरामोहरा बदलणार; कामतांचा विश्वास

विविध भागांना लाभ

पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी सांगितले की, गोव्याची पर्यटनवाढ समुद्रकिनाऱ्यांपुरती मर्यादित राहिलेली नाही. राज्यातील सांस्कृतिक वारसा, धार्मिक स्थळे, वेलनेस पर्यटन, ग्रामीण भागातील अनुभव, विविध उत्सव आणि खाद्यसंस्कृती यांकडेही पर्यटक मोठ्या प्रमाणावर आकर्षित होत आहेत. त्यामुळे पर्यटनाचा लाभ राज्यातील विविध भागांपर्यंत पोहोचत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com