Rohan Khaunte Dainik Gomantak News
गोवा

Water Sports NOC: गोव्यात जलक्रीडा उपक्रमांना एनओसी आवश्‍यक; मंत्री खंवटेंनी केला महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर

Minister Rohan Khaunte: प्रत्येक क्रूझवर मनोरंजनाचा कार्यक्रम साधारणतः एका तासाचा असतो. यामध्ये गोव्याच्या संगीताचा समावेश करणे अनिवार्य असेल, असे पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी सांगितले.

Sameer Panditrao

NOC Compulsion For Water Sports In Goa

पणजी : जलक्रीडा उपक्रमांसाठी पर्यटन विभागाचे ना-हरकत प्रमाणपत्र मिळाल्याशिवाय कॅप्टन ऑफ पोर्ट आता कोणालाही परवानगी देणार नाही. तसेच वॉटर स्पोर्टस् मालकांच्या समस्या समजून घेऊन त्यांना एकत्र काम करण्याचा सल्ला दिला आहे.

तसेच त्यांनी असोसिएशनशी संलग्न होऊन राज्यभरात एकच दर लागू करण्यास सांगितले आहे. यानंतर असोसिएशनच्या सदस्यांनाच बोट परवाना दिला जाईल, अशी माहिती पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी दिली. राज्यातील पर्यटनाच्या विविध उपक्रमांना प्रोत्साहन देण्यासाठी मंत्री खंवटे यांनी आज महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर केले.

क्रूझवर गोमंतकीय संगीत आणि खाद्यपदार्थ अनिवार्य

फेब्रुवारीपासून पर्यटन क्रूझवर गोमंतकीय संगीत वाजविणे आणि गोमंतकीय खाद्यपदार्थांचा समावेश करणे अनिवार्य केले जाईल. त्यामुळे स्थानिक कलाकारांना प्रोत्साहन मिळेल आणि पर्यटकांना गोव्याच्या संस्कृतीचा परिचय होईल.

प्रत्येक क्रूझवर मनोरंजनाचा कार्यक्रम साधारणतः एका तासाचा असतो. यामध्ये गोव्याच्या संगीताचा समावेश करणे अनिवार्य असेल, असे पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी सांगितले.

समाज माध्यमांनी केली दिशाभूल

पर्यटनमंत्री रोहन खंवटे म्हणाले की, "नववर्ष प्रारंभासंदर्भात समाज माध्यमांवर लोकांची दिशाभूल केली जाणारी माहिती प्रसृत केली जात होती. अनेकांनी गोव्यातील किनारे पर्यटकांअभावी ओस पडल्याचे समाज माध्यमांवर म्हटले होते. खरे तर गोव्यात मोठ्या प्रमाणात पर्यटक आले होते. राज्यातील सर्व पर्यटनस्थळांवर पर्यटकांची मोठी गर्दी होती."

भटके कुत्रे, जनावरांच्या समस्येवर काढणार तोडगा

पर्यटन स्थळांवरील भटके कुत्रे आणि मोकाट जनावरे यांमुळे स्थानिक आणि पर्यटकांना होणारा त्रास दूर करण्यासाठी पर्यटन विभाग, पशुसंवर्धन विभाग व पोलिस विभागाच्या नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे.

"गेल्या तीन महिन्यांपासून आम्ही यावर काम करत आहोत. आता पशुसंवर्धन विभागासोबत काम करून ही समस्या सोडविणार आहोत. बिगर सरकारी संस्थांच्या मदतीने भटके कुत्रे आणि गुरे यांच्या व्यवस्थापनाचे उपाय योजले जातील," असेही मंत्र्यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Andha Salim Arrested: खून, खंडणी, दरोडा, घरफोड्या करणाऱ्या 'अंधा सलीम'ला अटक; गोवा, महाराष्ट्र, कर्नाटकात गुन्हे

Boriem Bridge: बोरी पुलासाठी हवीये आणखीन जागा! 'या' 3 गावांसाठी MoRTHची नवी अधिसूचना, आक्षेप घेण्यासाठी 21 दिवसांची मुदत

मंत्रिपद नाही पण मायकल लोबोंना महामंडळ मिळाले; माजी उपमुख्यमंत्री कवळेकरांना कला अकादमीच्या अध्यक्षपदाची लॉटरी

Shetkari Aadhar Nidhi Scheme: पावसानं झोडपलं, सरकारनं सावरलं, 'डिसेंबरपर्यंत प्रति हेक्टर 40 हजार भरपाई देणार'; CM सावंतांची मोठी घोषणा

Bicholim: डिचोलीत दिवसाढवळ्या इमारतीचे गेट तोडताना परप्रांतीय युवकाला पकडले

SCROLL FOR NEXT