WRD Minister Subhash Shirodkar Dainik Gomantak
गोवा

2024 मध्ये गोव्यात पाण्याची कमतरता भासणार नाही; जलसंपदा मंत्री सुभाष शिरोडकर यांची माहिती

डिचोलीतील साळ येथे शापोरा नदीवर बांधण्यात येणारा 300 कोटी रुपयांचा बंधारा प्रकल्प डिसेंबर 2024 पर्यंत तयार

Kavya Powar

No Water Shortage in 2024: यावर्षी जरा उशीराच सुरू झालेला पाऊस आता परतीच्या मार्गावर आहे. महिनाभर उशीराच सुरू झाला असला तरी राज्याची तहान भागवू शकेल इतका पाऊस यंदा झाला.

याबाबत जलसंपदा मंत्री सुभाष शिरोडकर यांनी सांगितले की, डिचोलीतील साळ येथे शापोरा नदीवर बांधण्यात येणारा 300 कोटी रुपयांचा बंधारा प्रकल्प डिसेंबर 2024 पर्यंत तयार होईल अशी अपेक्षा आहे.

हा बंधारा एकदा वापरात आल्यावर 250MLD पाणी साठवणुकीसाठी ठेवण्यास मदत होईल. त्यामुळे राज्याची पाण्याची कोणतीही कमतरता भासणार नाही.

ते म्हणाले की, डिसेंबर 2024 पर्यंत बंधारा वापरासाठी तयार होणे अपेक्षित आहे. एकदा तो तयार झाल्यानंतर, सर्व पाण्याच्या गरजा पूर्ण केल्या जातील. या बंधाऱ्यामुळे कळंगुट आणि चांदेल जलशुद्धीकरण प्रकल्पांना पुरवण्यासाठी अतिरिक्त कच्चे पाणी साठवण्यास मदत होईल.

यामुळे बार्देश, डिचोली आणि पेडणे तालुक्यांतील पाण्याची गरज पूर्ण होण्यास मदत होईल. या बंधाऱ्यामुळे तिलारी धरणातील जास्तीचे पाणी नदीत सोडल्यानंतर पूर टाळण्यासाठी देखील मदत होणार आहे.

दुसरीकडे, चांदेल प्रकल्पाची क्षमता 15MLD वरून 30MLD पर्यंत दुप्पट करण्याचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. त्यासोबतच इतर जल प्रकल्पांची कामे देखील लवकरच पूर्ण होणार आहेत. त्यामुळे गोव्यात 2024 मध्ये पाण्याची कमतरता भासणार नसल्याचे मंत्री शिरोडकर यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ferrari Seized: महाराष्ट्रात नोंदणीकृत 7.5 कोटींची 'फेरारी' कर्नाटकमध्ये चालवली म्हणून केली जप्त; काय नेमकं प्रकरण? वाचा

Goa News Live: 54 जुन्या कदंब बस भंगारात; नव्या EV बसेस घेणार जागा

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

SCROLL FOR NEXT