Goa Shigmotsav Dainik Gomantak
गोवा

Goa Shigmotsav 2023: शिगमोत्सवातील सादरीकरणासाठी वेळचे बंधन नको- शिगमोत्सव समित्यांची सरकारकडे मागणी

सादरीकरणा साठी वेळ मिळत नसेल तर शिग्मोत्सवात सहभागी होऊन काय फायदा- पदाधिकारी

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Shigmotsav 2023 राज्य सरकारने शिग्मोत्सव साजरा करण्यासाठी 10 पर्यंत जी वेळ दिली आहे त्या वेळेत रोमटामेळ व चित्ररथ सादरीकरण होऊच शकत नसल्याने ही वेळ वाढवून द्यावी अशी मागणी अखिल गोवा शिगमोत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांनि कुडचडे येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली.

यावेळी श्री मंडलेश्वर माणागुरू शिगमोत्सव मंडळ, शिरोडें. - शुभम नाईक, सांवड्डें शिगमोत्सव मंडळ, सांवड्डें. निलेश तारी, सइश नाईक, श्री चंद्रेश्र्वर भूतनाथ शिगमोत्सव मंडळ, केपें. दिपराज नाईक, खांडेपार शिगमोत्सव समिती, खांडेपार पंकज जलमी, तसेच इतर शिग्मोत्सव मंडळाचे सदस्य उपस्थित होते.

गोवा पर्यटन खात्यातर्फे दर वर्षी शिग्मोत्सव मुरवणुकीचे आयोजन केले जाते पण यावर्षी ज्या वेळेचे बंधन घातले गेले आहे ते ऐकून आम्हाला आश्चर्य झाल्याचे सावर्डे शिगमोत्सव समितीचे निलेश तारी यांनी सांगितले.

शिग्मोत्सव हा गोव्यातील पारंपरिक उत्सव असून आम्ही फक्त बक्षिस मिळविण्यासाठी सादरीकरण करीत नाही तर ही संस्कृती टिकवून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे असे त्यांनी सांगितले.

काही ठिकाणी बरीच दुरी असते व रोमटामेळ सादरीकरण करण्यास बराच त्रास होतो व यासाठी जी सादरीकरण करण्यासाठी दुरी कमी करण्याची मागणी त्यांनी यावेळी केली.

रोमटामेळसाठी जे बक्षीस ठेवले जाते ते अत्यंत कमी असते व यासाठी बक्षिसाची रक्कम वाढवून द्यावी असे हरीश काकोडकर यांनी सांगितले. रोमटामेळाची तयारी करण्यासाठी दोन महिने तरी लागतात व खर्च सुद्धा बराच असतो असे त्यांनी सांगितले.

रोमटामेळात सहभागी होणारे युवक व युवती अनेक ठिकाणी कामाला असतात व आपले काम सांभाळून नंतर ते रोमटामेळ सादरीकरणासाठी येत असल्याने वेळ होतो व जे वेळचे बंधन घातले आहे हे ठीक नसून किमान रात्रौ 12 पर्यंत तरी वेळ वाढवून द्यावी असे त्यांनी सांगितले.

आमची पारंपरिक शिग्मोत्सवातील कला जिवंत ठेवण्यासाठी आता बरेच पंगड झाले असून प्रत्येकाला सादरीकरणा साठी वेळ मिळत नसेल तर शिग्मोत्सवात सहभागी होऊन काय फायदा असे सुरज परब यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

"हा खरा गोवा होता जो मला कधी दिसलाच नव्हता"! ‘गोंयकार’पण जपायचे आहे तर डोळ्यात अंगार हवा, मनात निर्धार हवा...

Gautam Gambhir: '..मला चुकायचे अधिकार आहेत'! विराट-रोहितच्या कसोटी निवृत्तीवरती गंभीरने सोडले मौन; क्रिकेटविश्वात खळबळ

Goa Accident Death: चिंताजनक! गोव्यात 715 अपघाती मृत्यू; हेल्मेट न वापरल्यामुळे सर्वाधिक दुर्घटना

ISL 2026: चुरशीचा सामना सुटला बरोबरीत! FC Goa ने पंजाबला रोखले गोलबरोबरीत; एक गुण खात्यात

Suryakumar Yadav: "..या गोष्टीची खंत राहील"! वर्ल्डकप जिंकल्यानंतरही कॅप्टन सूर्याने उघड केली नाराजी; वनडे क्रिकेटबद्दल म्हणाला की...

SCROLL FOR NEXT