Dabolim airport  Dainik Gomantak
गोवा

Goa Assembly: ‘दाबोळी’च्या पंखांमध्ये भरणार बळ; मुख्यमंत्री सावंत

Pramod Sawant On Dabolim Airport: युजर शुल्क कमी करण्यासाठी तसेच ‘व्हिसा ऑन अरायव्हल’साठी केंद्राकडे प्रयत्न

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: मोपा व दाबोळी या दोन्ही विमानतळांवरून होणाऱ्या एकूण हवाई वाहतूकपैकी ५७ टक्के वाहतूक दाबोळीवरून होत आहे. दाबोळी विमानतळ बंद होणार नाही व तो बंद करण्याचा सरकारचा अजिबात हेतू नाही. या विमानतळावर अधिक पार्किंग सुविधा, लँडिंग, युजर शुल्क कमी करण्यासाठी तसेच ‘व्हिसा ऑन अरायव्हल’साठी केंद्राकडे प्रयत्न करणार असल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज लक्षवेधी सूचनेवरील उत्तरामध्ये दिली.

दाबोळी विमानतळाच्या भवितव्यासंदर्भातील लक्षवेधी सूचना विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, आमदार एल्टन डिकॉस्ता, व्हेंझी व्हिएगस, क्रुझ सिल्वा, कार्लुस फेरेरा, विजय सरदेसाई, वीरेश बोरकर यांनी मांडली होती.

यावेळी मुख्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले की, दाबोळी विमानतळावर यावर्षी मे २०२४ पर्यंत देशी १६,७८९ विमानांमधून २७,०५,६०७ प्रवासी आले आहेत, तर १,१५३ आंतरराष्ट्रीय विमानांमधून १,९१,००९ प्रवासी आले आहेत.

मोपा येथील मनोहर आंतरराष्‍ट्रीय विमानतळावर यावर्षी मे २०१४ पर्यंत देशी ६५६९ विमानांमधून २०,२८,९१७ प्रवासी आले तर १५५ आंतरराष्ट्रीय विमानातून ४७,३०६ प्रवासी आले आहेत.

‘दाबोळी’वर ग्रेड सेपरेटर

दाबोळी विमानतळाचा विस्तार पुढील १० वर्षांत करण्यासाठी नौदलाच्या ताब्यात असलेली ८.३ एकर जागा ताब्यात घेण्यात येणार आहे. या विमानतळाच्या ठिकाणी ग्रेड सेपरेटरची सुविधा उपलब्ध केली जाणार आहे, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.

पर्यटनासाठी मोठी संधी

यावर्षी मे २०२४ पर्यंत राज्यात ४७,३४,५२४ देशी प्रवासी दाबोळी व मोपा विमानतळावरून तर २,३८,३१५ विदेशी प्रवासी दाबोळी व मोपा विमानतळावर उतरले आहेत. गोवा हे आंतरराष्ट्रीय पर्यटन स्‍थळ असल्याने येथे पर्यटनाला मोठी संधी आहे. त्यामुळे दाबोळी विमानतळालाही मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळाइतकेच महत्त्व आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Shravan Recipes in Goa: कणगाची खीर, नागपंचमीला पातोळ्या; श्रावणातील गोव्याची समृद्धता

Shubman Gill Record: शुभमन गिल बनणार नवा 'लिजेंड', डॉन ब्रॅडमनचा 88 वर्ष जुना विक्रम मोडणार; फक्त 'इतक्या' धावांची गरज

Goa Fishing: खरा गोंयकार ‘बाप्पा मोरया’ केल्याबरोबर मासळीच्या स्वादाचा आनंद तेवढ्याच खुषीने घेतो..

Origin of Goans: 6000 ईसापूर्व भारतीय पुरुषांचे इराणमध्ये स्थलांतर झाले; गोमंतकीयांच्या मूलस्थानाचा शोध

फोन देण्यासाठी दार उघडले, समोर दिसला मृतदेह; सॉफ्टवेअर अभियंत्याचा हणजूण हॉटेलमध्ये रहस्यमय मृत्यू

SCROLL FOR NEXT