Mobile Tower Dainik Gomantak
गोवा

सरकारी जागेत ‘टॉवर’ला ‘पंचायती’ची गरज नाही

नवे टेलिकॉम धोरण : सार्वजनिक बांधकाम खात्याचीच परवानगी पुरेशी

दैनिक गोमन्तक

मडगाव : एकीकडे गोव्यात ग्रामपंचायत निवडणुकीची धामधुम सुरु झालेली आहे, तर दुसरीकडे सरकारने स्वीकारलेल्या नव्या टेलिकॉम धोरणानुसार सरकारी मालकीच्या जागेत मोबाईल टॉवर उभारण्यासाठी संबंधित पंचायतीच्या वा अन्य कोणाच्याच परवानगीची गरज भासणार नाही. केवळ सार्वजनिक बांधकाम खात्याची परवानगी लागेल.

साबांखा, शिक्षण खाते व गोवा क्रीडा प्राधिकरण यांच्या मालकीच्या जागेत उभारल्या जाणाऱ्या मनोऱ्यासाठी ही तरतूद आहे.

सरकारने हल्लीच या संदर्भात एक परिपत्रक जारी करून भाग शिक्षणाधिकारी तसेच गटविकास अधिकाऱ्यांना त्यांच्या कार्यक्षेत्रात सदर टेलिकॉम धोरण व किरणोत्सर्जन याबाबत लोकजागृती करण्यास सांगितले आहे.

दरम्यान, सासष्टीचे गटविकास अधिकारी अमितेश शिरवईकर यांनी सर्व पंचायत सचिवांना एक पत्र पाठवून मे महिन्यात सचिवालयात झालेल्या बैठकीतील इतिवृत्तानुसार कृती करण्यास सांगितले आहे. या बैठकीत गोवा टेलिकॉम धोरणाबाबत निर्णय झाला होता. राज्यात विविध ठिकाणी मोबाईल टॉवर उभारण्याला लोकांचा विरोध होत आहे.

पंचायत निवडणुकीत उतरलेले अनेक उमेदवार या नव्या धोरणा टेलिकॉमबाबत जाणून चकीत झाले आहेत. चांदर पोलिस चौकीच्या आवारात पंचायतीची परवानगी न घेता सुरु झालेल्या अशा टॉवरच्या कामाबाबत विचारणा करण्यासाठी काही स्थानिक गेले तेव्या त्यांना टेलिकॉम धोरणाची माहिती मिळाली व त्यांना धक्काच बसला. दुसरीकडे वेळ्ळी मतदारसंघात असे चार टॉवर उभे रहात असून त्यातील एक आरियाल सरकारी शाळेच्या आवारात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Dance Viral Video: जिममध्ये साडीचा स्वॅग! काळ्या साडीत ट्रेडमिलवर तरुणीने धरला ठेका; नेटकरी म्हणाले, 'विषय हार्ड!'

illegal LED fishing: वास्कोत बेकायदेशीर 'एलईडी' मासेमारीचा पर्दाफाश; मत्स्यव्यवसाय विभागाकडून तीन बोटी जप्त

Dhuler: सफर गोव्याची! म्हापसा आणि कुचेली या गावच्या सीमेवरचे, मातीचे ओढ लावणारे 'धुळेर'

VIDEO: "हे संकट लवकर संपलं पाहिजे", पश्चिम आशियातील संघर्षामुळे भारतासमोर मोठं आव्हान, PM मोदींकडून जगाला शांततेचा संदेश

मोफत एन्ट्री अन् स्टेडियमचा फील! 'BCCI'चं क्रिकेटप्रेमींना मोठं गिफ्ट; IPL 2026 चे सामने 'या' 15 शहरांमध्ये पाहता येणार फ्री

SCROLL FOR NEXT