Schools in Goa  Dainik Gomantak
गोवा

फोंड्यात शाळांमधील सुविधांचे वाजले तीन तेरा

अपघातांची भीती : वाहतूक समस्या ठरतेय डोकेदुखी

दैनिक गोमन्तक

फोंडा : कोविड महामारीनंतर दोन वर्षांनी शैक्षणिक व्यवस्था पूर्वपदावर येत असली तरी अनेक शाळा, विद्यालयांत अजूनही सुविधांचे तीन तेरा वाजले आहेत. फोंडा तालुक्यातील अनेक शाळा, विद्यालयात सुविधांची वानवा असल्याने विद्यार्थ्यांना अडचणीचे ठरत आहे.

फोंडा शहर परिसरातील विद्यालयांत सुमारे तीन हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. ग्रामीण भागात हा आकडा मोठा आहे. मात्र शहर परिसरातील विद्यालयांत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना वाहतुकीची समस्या भेडसावत आहे. त्यामुळे अपघाताची भीती सतावत आहे.

खाण भागातील विद्यार्थ्यांची परवड

फोंड्याला लागून असलेल्या खाण भागातील विद्यार्थ्यांची अक्षम्य परवड होत आहे. खाणी सुरू होत्या, त्यावेळेला काही खाण कंपन्यांनी खाणव्याप्त ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी वाहतूक सुविधा उपलब्ध केली होती. खाण कंपन्यांनी ही सुविधा पुन्हा सुरू करण्यासाठी सरकारनेच त्यांच्यावर दबाव आणावा, अशी मागणी खाण भागातील पालक करत आहेत.

प्राथमिक शाळा चकाचक...!

फोंड्यातील काही सरकारी प्राथमिक शाळा विद्यार्थी पटसंख्येअभावी बंद पडल्या आहेत. मात्र ज्या शाळा-विद्यालये चालतात, त्यांची दुरुस्ती करण्यात आली असून, चकाचक शाळा विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करण्यात आल्या आहेत. फक्त या शाळांत विद्यार्थ्यांची संख्या वाढण्याची आवश्‍यकता व्यक्त होत आहे.

बालरथ अपुरे : खांडेपार येथील एमआयबीके विद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या खूप आहे. या विद्यालयात तिस्क-उसगाव तसेच इतर भागांतील विद्यार्थी शिकण्यासाठी येत असले तरी त्यांना बालरथ सुविधा कमी पडत आहे. त्यामुळे खाजगी प्रवासी बसगाड्यांवर त्यांना विसंबून राहावे लागते. याशिवाय रस्त्याच्या कडेला प्रवासी निवारा शेड नसल्याने विद्यार्थी गाड्यांच्या आडोशाला थांबतात. या विद्यार्थ्यांना ऊन व पावसाचा मारा सहन करावा लागतोच, पण रस्त्याच्या कडेला उभे राहावे लागत असल्याने अपघाताचा धोका संभवतो. या ठिकाणी यापूर्वी अनेक अपघातही झाले आहेत.

पार्किंग समस्या

  • फोंड्यातील आल्मेदा हायस्कूलसमोरच मुख्य रस्ता असल्याने रस्ता ओलांडताना विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेऊन जावे लागते.

  • या ठिकाणी विद्यार्थ्यांना विद्यालयात आणण्यासाठी आणि घेऊन जाण्यासाठी येणाऱ्या पालकांची संख्याही मोठी असल्याने दुचाकी व चारचाकी पार्किंगच्या समस्येला सामोरे जावे लागते.

  • या विद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना रस्ता पार करताना धोकादायक ठरू नये यासाठी ‘सबवे’ अर्थातच भुयारी मार्ग बांधण्यात आला असला तरी त्याचा वापर होत नाही.

  • बऱ्याचदा पालकच मुलांना रस्ता पार करून घेऊन जात असल्याने धोका संभवतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT